हे सत्य की कावा ? - Page 395

एहे सत्य की कावा? ३५३

सोडली ते कारण वैयक्तिक नसून तात्विक स्वरूपाचे आहे, असाही समज सर्वत्र पसरलेला दिसतो पण या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, असे आम्हास खात्रीपूर्वक वाटत नाही. मुनशी काँग्रेसच्या बाहेर पडले असे “म्हणण्यापेक्षा गांधीनी त्यांना मुद्दाम हेतुपुरस्पर विवक्षित कार्यक्रम साधण्याकरिता काँग्रेसच्या बाहेर सोडले आहे, हेच म्हणणे आम्हाला तरीं संयुक्तिक दिसते. काँग्रेसमधून आतापर्यंत पुष्कळ लोक बाहेर पडून गेले आहेत. श्री. नरीमन, डॉ. खरे, सुभाषचंद्र बोस, एम्‌. एन्‌. रॉय यांची उदाहरणे सर्वांच्या नजरेसमोर आहेत. ही सर्व माणसे काँग्रेसमधून बाहेर पडली; परंतु त्यांनी बाहेर पडतांना गांधीची परवानगी किंवा आशिर्वाद मागितल्याचे दिसून येत नाही: गांधीच्या दृष्टीने, पाहता काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या वरील व्यक्तीपेक्षा मुनशी हे कमी पापी ठरंतात असे कोणालाही म्हणता येणार नाही. अहिंसेचे तत्त्व हा गांधीचा धर्म आहे. त्या तत्त्वाला झुगारून देऊन बाहेर पडणारा माणूस गांधींच्या दृष्टीने अधर्मीच म्हटला पाहिजे. अशा दृष्टीने श्री. मुनशी हे अधर्मी व पातकी ठरले असतांना देखील त्यांना गांधींनी ते काँग्रेसमधून बाहेर जात असतांना आशिर्वाद द्यावा, त्यांचे शुभ चितावे ह्वे मोठेच गौडबंगाल वाटते. आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी गांधींना विरोध करून काँग्रेसमधून बाहेर पाऊल टाकले त्या त्या प्रत्येकाला गांधींनी आपला शत्रू समजून त्यांना नेस्तनाबूत करण्याकरिता आपली सर्व शक्ती कशी वेचली याचा खेदकारक इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. मुनशीच्या बाबतीत आपले भस्मासुरी वर्तन सोडून मुनशीचा द्रोह आपल्या पोटात घालावा व त्याच्याबद्दल एवढा ओलावा दाखवावा यांच्या मुळाशी काहीतरी हेतू असलाच पाहिजे, असा आम्हास तरी संशय येतो. i ¥ `

हिन्दू महासभेला शह देण्याकरिता हा डाव गांधी व मुनशी यांनी मिळून केला असावा, असा अन्दाज केल्यास तो चुकीचा ठरेल, असे आम्हास आज तरी वाटत नाही. एक गोष्ट निश्चित आहे की मुंबई व अहमदाबाद या ठिकाणी झालेला हिंदू-मुसलमानांच्या दंग्यामुळे गुजराथी प्रजेचा काँग्रेसवरचा विश्वास साफ उडालेला आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेसवरती असंतुष्ट झालेली गुजराथी प्रजा

- सधन आहे आणि तिच्या द्रव्यबलाशिवाय कोणतीही राजकीय संस्था जोम धरू शकत नाही. चवथी गोष्ट, हिन्दू महासभेचे पुढारी बॅ. सावरकर हे काँग्रेसचे कट्टर शत्रू आहेत. या गोष्टी गांधीना व त्यांचे सहकारी यांना पूर्णपणे अवगत असल्याच पाहिजेत व गुजराथी समाजाचा ओघ हिन्दूमहासभेकडे वळला तर काँग्रेसला शह देण्यास समर्थ होईल ही गोष्ट देखील गांधी व त्यांचे सहकारी यांना न कळण्यासारखी आहे, असेही म्हंणता येणार नाही