इंग्रजाची धोकेबाजी ३५७
आहे तिच्याबद्दल तितकीच, किंबहुना जास्त चीड आल्यावाचून राहत नाही. सप्रू परिषदेमध्ये अस्पृश्य वर्गाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला नाही, याबद्दल कोणत्याही प्रकारची दिलगिरी प्रदर्शित करण्यात आलेली नाही. परंतु सप्रू परिषद काहीतरी विधायक कार्य करील अशी आशा आम्हाला तरी वाटत नव्हती. म्हणून तिच्या संबंधाने निराशाही वाटत नाही. परंतु हिंदूमहासभा व तिचे पुढारी बॅ. सावरकर यांच्या वर्तनासंबंधाने मात्र आश्चर्य वाटते. बॅ. सावरकर हे एकेकाळी ब्रिटिशांचे कट्टे शत्रू होते. ब्रिटिशांचे राज्य घालवून देण्याकरिता शस्त्रास्त्राची सामुग्री गोळा करण्याकरिता त्यांनी आपले अर्धे अधिक आयुष्य खर्ची घातले. असे असतांना आज बॅ. सावरकर म्हणजे इंग्रजांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. व्हाईसरॉयसाहेबांनी घोषणा करावी व सावरकरांनी शिंग वाजवून आपली पसंती जगजाहीर करावी, याशिवाय सावरकर दुसरे काही करीत असल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणावरून तरी दिसून येत नाही. हे जे त्यांनी लागूंल- चालन चालविलेले आहे त्याला काही सार्वजनिक हिताचा आधार असता तर त्याला कोणी दोष दिला नसता. परंतु इंग्रजांची हिंदू लोकासंबंधीची दृष्टी कशी आहे याचा विचार केला असतांना असेच म्हणावे लागते की, इंग्रज लोक हिंदूच्या हितसंबंधासाठी काय करतात या प्रश्नसंबंधाने सावरकरांना कसलीच चिता वाटत नसावी. व्हाईसरॉय साहेब आपल्याशी पत्रव्यवहार करतात एवढ्यानेच सावरकर फुगून जाऊन खूष झालेले दिसतात. नाहीतर कोणीही हिंदूंमहासभेचा पुरस्कर्ता व्हाईसरौयने घडवून आणलेल्या कार्यकारी मंडळाच्या योजनेस पाठिबा देताना, सावरकरांचे सगळे राजकारण इतके विचित्र दिसते की, त्यांना राजकारण कळते किंवा नाही याचा आम्हास तरी संशय वाटू लागला आहे.
' हिदूमहासभा ही संस्था कम्युनल अवॉर्ड याला विरोध करण्याकरिता प्रस्थापित करण्यात आली. मुसलमान लोकांच्या लोकसंख्येपेक्षा मुसलमानांना कायदे _ कौन्सिलात व कार्यकारी मंडळात जादा प्रमाणात प्रतिनिधी ब्रिटिश सरकारने दिले, हीच तर हिंदूमहासभेची मोठी तक्रार आहे व हेच हिंदूमहासभेच्या दृष्टीने इंग्रजांनी केलेले मोठे महत् पाप, असे समजले जात असे. ही चूक दुरुस्त करून मुसलमानांना जादा दिलेले प्रतिनिधी कमी करावयास लावून लोकसंख्येच्या प्रमाणात मुसलमानांच्या प्रतिनिधीचे कोष्टक आणून बसविणे हेच हिंदूमहासभेचे मोठे महत्त्वाचे कार्य होऊन बसले होते. गेल्यावर्षी जेव्हा कार्यकारी मंडळाची नवीन घटना होण्याचे घाटत आले होते व ज्यावेळी जिन्हा यांनी मुसलमानांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी मागणी केली होती त्यावेळी सावरकंर