इंग्रजाची धोकेबाजी - Page 400

34¢ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

यानी हिंदूमहासभेतफे त्याला विरोधही केलेला होता. तसेच त्यावेळी होणाऱ्या कार्यकारी मंडळात एक अस्पृश्यांचा व एक शिखांचा प्रतिनिधी घेण्यात यावा, अशी घोषणा केली होती. आश्चर्याची गोष्ट ही की, आज अमलात आलेल्या कार्यकारी मंडळात मुसलमानांना जवळ जवळ ५० टक्के प्रतिनिधीत्व इंग्रज सरकारने दिलेले आहे. परंतु अस्पृश्यांना अथवा शिखांना एकही प्रतिनिधी देण्यात आलेला नाही. असे असतांना ज्या व्यवस्थेत मुसलमानांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे ती व्यवस्था चांगली आहे, अशी प्रशंसा बॅरिस्टर तात्याराव सावरकर करीत आहेत ! हे विचारवैचित्र्य पाहून कोणासही सावरकर यांस बुद्धिभ्रंश झाला आहे, असे वाटल्यास त्यात आश्चर्य नाही. अस्पृश्य व शीख यांच्या प्रतिनिधित्वासंबंधानेही सावरकर यांच्या दृष्टीकोणात मोठाच फेरबदल झालेला दिसून येतो. गतवर्षी अस्पृश्यात शीख यांचे प्रतिनिधी कार्यकारी मंडळात घेतले पाहिजेत, असे आग्रहपूर्वक सांगणारे सावरकर आज फक्त शीख लोकांचा प्रतिनिधी न घेतल्याबद्दल खेद प्रदर्शित करीत आहेत व सावरकर हा शिखावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी करीत आहेत. परंतु अस्पृश्यांचा प्रतिनिधी न घेतल्याबद्दल त्यांनी एक चकार शब्द काढला नाही. अस्पृश्यांच्या बाबतीत एका वर्षामध्ये सावरकरांच्या दृष्टीकोणात हा फरक घडण्यास कोणते बलवत्तर कारण झाले असेल हे आम्ही सांगू शकत नाही. या त्यांच्या वर्तनावरून हिंदूमहासभा ही संस्था सर्वस्वी ब्राह्मणशाहीच्या आहारी गेली असल्याचे दिसून येते. त्याशिवाय एवढां मोठा प्रमाद सावरकरांच्या हातून घडला नसता.

या बाबतीत सर्व हिंदूजनांना आम्हास एक सूचना करावीशी वाटते. आज जो कोणी हिंदुस्थानातील राजकारणाचे बारकाईने निरीक्षण करून पाहील त्याला एक गोष्ट दिसून येईल की, इंग्रज सरकार हे मुसलमानांच्या घरी गहाण पडले आहे व ते सर्वस्वी मुसलमानांच्या ताब्यात गेले आहे. हिंदूच्या संबंधाने इंग्रजांच्या मनात कुडाभाव असावा, असा संशय येतो. गांधीनी लढाईच्या बाबतीत इंग्रजाशी जसा असहकार पुकारलेला आहे त्याच्याहीपेक्षा कट्टर स्वरुपात जिन्हा यांनी इंग्रजांशी असहकार आरंभिलेला आहे. असे असतांना मुसलमान लोकांना जिन्हापासून फोडून वश करून घेण्याकरिता इंग्रज लोक वाटेल त्या प्रकारचे प्रयत्न करीत आहेत; इतकेच नव्हे तर मुसलमानांना जवळ जवळ yo टक्के प्रतिनिधित्व देवून पाकिस्तानचा मोबदला त्यांनी अगाऊच देवून टाकला आहे. परंतु गांधीपासून हिंदू लोकांना परावृत्त करून घेण्यास इंग्रजांनी काही प्रयत्न केला नाही व तशी त्यांना इच्छाही झालेली नाही. इंग्रज व मुसलमान यांच्या सहकार्याने, संगनमताने व भागीदारीने आजचे हिंदुस्थानचे राजकारण