इंग्रजाची धोकेबाजी - Page 401

इंग्रजाची धोकेबाजी ३५९

चालले आहे. या भागीदारीत इंग्रज सरकार वश्या भागीदार असल्याचे दिसून येते. निदान मुसलमान सांगतील त्याप्रमाणे वागणे याशिवाय त्यांना गत्यंतर राहिलेले नाही. ही मुसलमान इंग्रजांची भागीदारी हिंदूना अत्यंत हानीकारक होणार हे कोणासही सांगावयास नको. आजपर्यंत उभयतांच्या धोरणावरून पाहिले असतांना एकंदरीत या देशाला स्वराज्य मिळू द्यावयाचे नाही, किंवा देणे भाग पडले तर त्याचा विचका करून मग द्यावयाचे, हाच त्यांच्या भागीदारीचा परिणाम होणार आहे. या घोर परिणामापासून हिंदूंना जर आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर हिंदूंनी अस्पृश्यांशी समबुद्धीने वागण्याची “उदारबुद्धी दाखविली पाहिजे. या घडलेल्या प्रकारावरून मात्र अस्पृश्य वर्गांना बोध घेण्याचा एक मोठाच प्रसंग उत्पन्न झाला आहे, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. दोघांनीही दगा केला आहे. इंग्रज सरकारवर व हिंदू लोकांवर त्यांनी कितपत विश्‍वास ठेवावा, याचा त्यांना विचार करण्याची वेळ आली आहे, असे आम्हास वाटते. याविषयी केव्हातरी लिहिण्याचा आमचा इरादा आहे परंतु आज तरी इंग्रज सरकार व हिंदूमहासभा या उभयतांचा जोराचा निषेध करणे, हे अस्पृश्य लोकांचे या घडी मोठेंच कर्तव्यकर्म होऊन राहिले आहे.

eb

अग्रलेख : जनता ता. ९ ऑगस्ट १९४१.

उद्घृत : गाजरे, खंड ५, पृ. ४३-४७.