फसव्या राष्ट्रवादाच्या भुलथापांनी व पोकळ घोषणांनी कामगार-वर्ग फसला जावू नये. - Page 407

| 900

फसव्या राष्ट्रवादाच्या भुलथापांनी व
पोकळ घोषणांनी कामगार-वर्ग फसला जावू नये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कामगार परिषदेस संदेश

हिंदी कामगार फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन मुंबईत ता. २७, २८ व २९ डिसेंबर रोजी भरणार आहे. अघिवेशनानिमित्त वरळी येथे जेलजवळील मैदानांत मंगळवार ता. २८ डिसेंबर * रोजी संध्याकाळी gil वाजता कामगारांची प्रचंड जाहीर सभा होणार आहे. हिंदी कामगार फेडरेशनच्या या अधिवेशनासाठी हिंदुस्थान सरकारचे मजूर-मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीं खालील संदेश पाठविला आहे :--

“ मला या परिषदेला हजर राहातां येत नाही याबद्दल अत्यंत वाईट वाटते. हिंदी कामगार फेडरेशन ही संस्था ट्रेड. युनियन काँग्रेसपेक्षां स्वतंत्र रीतीनें कामगार-परिषद भरवीत आहे यामुळें मला विशेष आनंद होत आहै. कामगारवर्गानें कासगारसंघांच्या मर्यादित कामांतच गुरफटून बसू नये असा धडा हिंदी कामगार फेडरेशनकडून कामगारांना मिळेल अशी मला आशा वाटते. तसेंच फसव्या राष्ट्रीयवादाच्या भुलथापांनीं व पोकळ घोषणांनी कामगार-वर्ग फसला जावूं नये, कारण कामगारांची पिळणूक करणें हेंच अशा राष्ट्रीयवादाचें कार्य असतें. हे सत्य हिंदी कामगार फेडरेशनच्या या प्रयत्नामुळे कामगारांना पटेल, असा मला विश्‍वास वाटतो.

एम्‌. एन्‌. रॉय यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांचा, खंबीर मनाचा व निर्भीड वृत्तीचा बुद्धिमान नेता कामगारांना मिळाला ही विशेष आनंदाची गोष्ट होय. एम्‌, एन्‌. रॉय यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा प्रबल राजकीय पक्ष निर्माण होईल, व देशाच्या अधिकारांची सूत्रे हातीं घेण्याइतका हा पक्ष बलवान होईल अशी मला आशा वाटते.

तुमची परिषद यशस्वी होवो |

(सही) बी. आर. आंबेडकर. “

969

* वर्ष दर्शविलेले नाही.

सदरहु परिषद मणिबेन कारा, स्वागताध्यक्ष, वार्षिक परिषद यांचे द्वारे आयोजित होती.

वाय ६४१ - २६