५०१
आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे ! त्याच बरोबर
गुलामगिरीला आम्ही ठोकरीने उडवणार !
डॉ. बाबासाहेड आंबेडकर सत्याग्रहींना तेजस्वी संदेश देतात :--
' आमचे भांडण हे नेहमी तत्त्वासाठी असते. ६ कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे. आम्हाला राजकीय संरक्षण पाहिजे आहे. है राजकीय संरक्षण अशा तर्हेचे पाहिजे की, मूर्खाच्या हातून किंवा लबाडांच्या हातून आमचे काहीही नुकसान होता कामा नये. आमच्या चळवळीमध्ये मूर्खाला किंवा लबाडाला थोडादेखील वाव नाही. लुच्च्या-लफंग्याला जागा मिळणार नाही अशा तऱ्हेची चळवळ आम्हाला करावयाची आहे. इतर लोकांप्रमाणेच आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे. आम्हाला कोणाचीही-परकीयांची किंवा स्वकियांची गुलामगिरी पत्करायची नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे. परंतु त्याच बरोबर आम्हाला लोकशाहीदेखील पाहिजे आहे. “
'“ आपण सर्वांनी तन-मन-धन अर्पण करून आपल्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला पाहिजे. स्वार्थत्यागातच आपला विजय आहे. काँग्रेसचे लोक म्हणतात, ' झंडा उंचा रहे हमारा. ' आपण आपल्या झेंड्यासाठी लढले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपला झेंडा ' नीचा ' होणार नाही, यासाठी आपण सर्वांनी आत्मीयतेने झटले पाहिजे आणि आपला झेंडा सतत फडकवीत ठेवला पाहिजे. " "
$®
१; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा--रशंकरराव खरात, पु. २७७.
जनता, दि. २७ जुलै १९४६ चौकटीतील मजकूर.