तरूणांनी दोन गोष्टी सिद्ध कराव्या ! - Page 409

902
तरुणांनी दोन गोष्टी सिद्ध कराव्या !

ना. जोगेंद्रनाथ मंडल यांचे अध्यक्षतेखाली नागपूर येथे दिनांक २५ डिसेंबर १९४६ ला भरलेल्या अ. भा. दलित वर्ग विद्यार्थी परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश पाठविला होता. तो येणेप्रमाणे--

' अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस्‌ फेडरेशनहून वेगळे असें अखिल भारतीय शेड्युल्ड SREY स्टूडंटस्‌ फेडरेशनचे अधिवेशन भरवण्याचे तुम्ही ठरवले हैं पाहून मला आनंद वाटत आहे. तुमचा हा विचार स्तुत्य आहे आणि मी त्याशीं सहमत आहे. मी नामदार मंडलाना याबाबत बोलून ठेवले आहे; तें तुमच्या अधिवेशनला निश्चितपणे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. मला तुमच्या अधिवेशनाला हजर राहाता आले असते तर बरे झाले असते; पण ते शक्य दिसत नाही. परंतु तुमचें हें अधिवेशन उत्तमरित्या पार पडेल अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो, |

आपल्या तरुणांनीं दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली म्हणजे योग्य संधी मिळालीं असता आमचे तरुण बुद्धीमत्ता आणि कर्तव्य यामध्ये कुणालाही हार जाणार नाहींत. दुसरी म्हणजे, वैयक्‍तीक सुखाच्या पाठीमागे आमचा तरुण वर्ग नसून तो आपली जमात स्वतंत्र, कर्तृत्ववान बनावी आणि इतरांकडून मान्यता मिळवणारी व्हावी यासाठीं ते प्रयत्न करीत आहेत ; हे त्यांनीं सिद्ध करून दाखविलें पाहिजे. जर हें अधिवेशन आमच्या तरुणांना ह्या दोन गोष्टी पटवून देईल तर ते सार्थकी लागले असे म्हणावयास हरकत नाही.

आणि ते तसे पटवून देईल असा मला विश्‍वास आहे.

मी आपणास सुयश इच्छितो. “

गरूड, दिनांक ९ फेब्रुवारी १९४७.