१०३
ज्या लोकांमध्ये आपला [जन्म ] [झाला ]
त्यांचा उद्धार करणे आपले [कर्तव्य ]
नवयुग : आंबेडकर विशेषांकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
अस्पृश्यांसाठी दिलेला संदेश
' माझ्या पंचावन्राव्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात. त्यासाठी तुम्हांला संदेश पाहिजे आहे. आपल्या या हिंदुस्थानामध्यें राजकीय पुढान्याला अवतारी पुरुषाप्रमाणें मान दिला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण हिंदुस्थानांत अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हें असें असावें ही दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळींच आवडत नाही. मी लोकशाहीचां कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतिपूजा कशी आवडेल ? विभूतिपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर ह्या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवळ्यानेच त्या पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे समाधान व्हावयास इवे. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणें ही गोष्ट मला बिलकूल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अधःपात होतो. पण हे ह्या ठिकाणी सांगून काय फायदा ? राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढवून बसविले म्हणजे त्याला तें आपलें सोंग उत्तम त-हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयायांना संदेश हा दिलाच पाहिजे |
अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे ? संदेश देण्याएंवजी मी त्यांना ग्रीक पुराणांतील एक गोष्ट सांगतो. डिमेटर ह्या ग्रीक देवतेवर होमरने लिहीलेल्या स्तोत्रांत ही गोष्ट आलेली आहे.
“ ही डिमेटर देवी आपल्या मुलीच्या शोधार्थ हिंडत केलीओसच्या राज्यांत आली. तिनें दाईचा वेष घेतला होता. म्हणून तिला कोणी ओळखले नाही. राणी मेहोनैराने आपले ' डिमोफून ' नांवाचे तान्हे मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली. रोज रात्री राजवाडयांतली सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी ह्या मुलाला पाळण्यांतून हळूच बाहेर काढी आणि त्याचे कपडे उतरून