३७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परंतु तथागत बुद्धाने ह्या असल्या कोणत्याच गोष्टीचे प्रतिपादन केलेले नाही. ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्या सारखा अंहभाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही किंवा आत्मप्रौढीही गाइलेली नाहो. बुद्धाने केवळ आपण एक मानवपुत्र असल्याचे सांगर सर्व साधारण माणूस म्हणूनच त्याने आपल्या धर्ममतांचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केलेला आहे. इतरांसारखे त्याने स्वतःचे मुळीच दैवीकरण केलेले नाही किंग आपण अलौकिक चमत्कार केलेले आहेत असे लोकांना सांगून त्यांना भुरळ पाडण्याचा किंवा त्यांची वंचना करण्याचा अल्पसाही प्रयत्न केलेला नाही. तथागत बुद्धाने 'मार्गदाता' व 'मोक्षदाता' यांत अगदी स्पष्ट असा फरक केलेला आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे वागाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल, स्वर्ग मिळेल, अशी भूमिका ख्रिस्त, पैगंबर व कृष्ण ह्यांनी घेतलेली आहे. उलट मी | केवळ एक मार्गदर्शक आहे, त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुम्हीच ठरवायचे आहे. माझी तुमच्यावर कोणतीच बळजोरी नाही, अशी भूमिका तथागत बुद्धाची आहे. बुद्धाने आपले म्हणणे लोकांनी मानावे म्हणून खिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखी मोक्षाची, स्वर्गाची किंवा मुक्तीची लालूथ दाखविलेली नाही. जीवनातील दुःख नष्ट करून सुखटप्राप्ती प्रत्येक मनुष्याला करून घेता येते. यावरच तथागत बुद्धाने भर दिलेला आहे.
अजून एक महत्त्वाचा फरक या चौघांत आढळून येतो. ख्रिस्त व पैगंबर हे स्वतःला अनुक्रमे परमेश्वराचा एकुलता एक पुत्र व खास दूत म्हणवून घेत असल्याने त्यांनी सांगितलेले प्रत्येक वचन देवाच्या मुखातील आहे; प्रत्यक्ष देवाने त्यांना सांगितलेले आहे, असा ते दावा करतात. यास्तव ते वचन कधीही खोटे असू शकत नाही आणि म्हणून ख्रिस्ताने किंवा पैगंबराने सांगितलेल्या वचनांवर जगातील कोणत्याही व्यक्तीने अविश्वास दाखवू नये किंवा आशंका बाळगू नये असा आग्रह ते दोघेही करतात. कृष्णाच्या बाबतीत सारेच काही निराळे आहे. कृष्ण हा स्वतःलाच परमेश्वर म्हणवून घेत असल्याने त्याने सांगितलेले प्रत्येक
वचन अंतीम सत्य होय आणि म्हणून ते शंकातित आहे, अचूक आहे, असा तो
आदेश देतो. परंतु तथागत बुद्धाने असा कोणताच दावा केलेला नाही.
महापरिनिर्वाण सुत्ता' मध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की, माझा धम्म बुद्धिवादावर व अनुभवावर आधारित आहे आणि म्हणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे असे समजून अंधानुकरण करू नये, बुद्धिप्रामाण्य व अनुभव हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानानुरूप व परिस्थितीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी