बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 418

३७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

धम्म' या शब्दात बुद्धाने जो क्रांतिप्रवण असा विचार अंतभूर्त केलेला आहे तोच gA इतर धर्माकडून डावलला गेला आहे, दृष्टिआड केला गेला आहे. वैदिकांनी योजलेला धर्म” हा शब्द सर्वार्थाने बुद्धाच्या 'धम्म' ह्या शब्दापासून भिन्न आहे. नैतिक मूल्यांशी निगडित असलेला अर्थ वैदिकांच्या धर्म या शब्दाशी केव्हाही सूत्रबद्ध नाही. . ईश्वराशी संबंधित धर्मकांड करणे किंवा रोमन पुरोहितांच्या जपजाप्याशी निगडित असलेल्या पारिभाषिक अर्थाने विधी करणे म्हणजे धर्म होय असे ब्राह्मणांनी व पूर्वमीमांसाकार जैमिनी ह्याने धर्माचा अर्थ केलेला आहे. ब्राह्मणांच्या धर्म ह्या कल्पनेनुसार ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी यज्ञयाग करून बलिप्रदान करणे व जपजाप्यादी पूजाअर्चा करणे, हे सर्व धर्मकांड धर्माशी बद्ध-असल्यांने ब्राह्मणी धर्माचा किंवा वैदिक धर्माचा नीतिंमत्तेशी सुतराम संबध येत नाही.

याच्या अगदी उलट बुद्धाने धम्माचा अर्थ केलेला आहे. ' पू नाअर्चा, जपजाप्य यज्ञयाग इत्यादी ईश्वर विषयक कर्मकांडाशी बुद्धाने सांगितलेल्या धम्माचा काडीचाही संबंध येत नाही, ईशवरविषयक सारे कर्मकांड He म्हणजेच होय हे बुद्धाने सपसेल नाकारले आहे. ईश्वर विषयक कर्मकांडाऐवजी तथागताने आचारशीलेची प्रतिष्ठापना धर्माचा गाभा म्हणून केलेली आहे. . ब्राह्मण आचार्य व तथागत बुद्ध ह्या दोघांनी जरी धर्म हा एकच शब्द वापरला असला तरी दोघांच्याही मूलभूत अर्थामध्ये मात्र वर निर्देशिल्याप्रमाणे फरक आहे. तथागत बुद्ध हाच असा एक धर्मवेता होऊन गेलेला आहे की ज्याने नीतितत्त्वांना धर्माचा एक आधारभूत पाया मानलेला आहे.

भगवद्रीतेचा अभ्यास केला म्हणजे असे दिसून पडते की, कृष्णसुद्धा स्वतःला पारंपारिक धार्मिक विधी व जपजाप्य इत्यादी कर्मकांडापासून अलिप्त ठेवू शकला नाही. उलट त्याने भगवद्गीतेत उपदेशिल्याप्रमाणे निष्काम. कर्माची किंवा अनासक्ती योगाची लोकांच्या मनावर भुरळ पाडून कर्मकांडाचाच उदोउदो केलेला आहे. . बालवीर (स्काउट) जसा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता परोपकार करतो, तशा अर्थाचे निष्काम कर्म ह्या शब्दाची व्याख्या आहे असे म्हटले जाते. परंतु निष्काम कर्माचा हा अर्थ, तो शब्द मुळात ज्या अर्थाने वापरला गेला, त्या अर्थापासून दिशाभूल करणारा आहे. निष्काम कर्म ह्या शब्दयोजनेतील 'कर्म' हा शब्द उदात्त भावनेने वापरल्या जाणाऱ्या परोपकार कृत्य ह्या अर्थाने मुळीच वापरला गेला नाही. तर तो शब्द ब्राह्मणांनी किंवा जैमिनीने योजलेल्या इश्वरविषयक आचार ह्या अर्थाने वापरला गेला आहे. धार्मिक विधीच्या दृष्टिकोनातून पूर्वमीमांसाकार जैमिनी व भगवद्गीताकार कृष्ण ह्या दोघांनी फक्त एकाच बाबीत मतभेद व्यक्त केलेला आहे