बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३७७
धार्मिक जपजप्याच्या व पूजाअर्चेच्या विधीमध्ये ब्राह्मणांनी दोन विभाग केलेले आहेत. एक नित्य कर्म व दुसरे नैमित्तिक कर्म. दररोज व नियमित स्वरूपात केल्या जाणाऱ्या विधी नित्य कर्मात मोडल्या गेल्या, त्यांची सांगड कोणत्याच फलाशी घातली गेली नाही. ह्याच कारणास्तव त्यांना निष्काम कर्म म्हटले गेले. उलट ज्या विधी कोणत्या तरी खास निमित्ताने केल्या जात त्यांना नैमित्तिक कर्म म्हटले गेले. मनामध्ये जेव्हा कोणत्या तरी फलाची अपेक्षा धरली जात असे किंवा इच्छा केली जात असे तेव्हाच ही नैमित्तिक कर्म केली जात. म्हणूनच त्यांना 'कामायकर्म' असेही म्हटले गेले. भगवद्गीतेत कृष्णाने ज्या कर्माचा धिक्कार केलेला आहे तेच हे कामायकर्म होय. फलाच्या अपेक्षेने न केल्या जाणाऱ्या जपजाप्यादी नित्य कर्माचा म्हणजेच निष्काम कर्माचा कृष्णाने कधीही निषेध केलेला नाही. उलट त्याने त्यांचे गुणगानच गाइले आहे. निष्काम कर्माच्या संबंधात कृष्णाची विचारसरणी लक्षात घेता असाच निष्कर्ष काढावा लागतो की, पूजाअर्चा, जपपाप्य ही नित्यकर्मे करण्यासाठी कृष्णाने नैतिक आचारावर कदापि भर दिलेला नाही. कृष्णाच्या दृष्टिकोनातून धर्म ही नैतिक बाब नसून नुसते कर्मकांडच आहे; आणि तेही कर्मकांड असे की, .ज्याचा निष्काम कर्माशी काडीचाही संबंध नाही अशा प्रकारचा जपजाप्य किंवा यज्ञयाग होय.
दुसरा एक महत्त्वाचा फरक बौद्धधर्म व हिंदुधर्म यात आहे. हिंदुधर्म हा असमानतेचा पुरस्कार करणारा आहे. हिंदू धर्माने मान्य केलेली चातुर्वर्ण्य समाजपद्धती हीच असमानतेची मूलभूत आधारशिला आहे. चातुर्वर्ण्य समाजपद्धतीमुळेच जातीभेद निर्माण होऊन उच्चनीचतेची भावना लोकात दृढ झाली. अगदी ह्या उलट समतेचा पुरस्कार करण्यासाठी बुद्ध उभा ठाकला. त्याने चातुर्वर्ण्याविरूद्ध केवळ आवाजच उठविला नाही, तर त्याने एक महान असा लढाही पुकारला व चातुर्वर्ण्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा आटोकाट प्रयत्न
केला.
हिंदु धर्मशास्त्रानुसार शूद्रांना व स्त्रियांना विद्या देण्याचे नाकारले गेले आहे. एवढेच नव्हे तर संन्यास. घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांना नाकारला गेला आहे. परंतु बुद्धाने असे कोणतेच बंधन घातलेले नाही; किंवा कुणाला मज्जावही केलेला नाही. त्याने आपल्या भिक्खुसंघात इतरांबरोबर शूद्रांना सुद्धा सामील करून घेतले. त्याने चातुर्वर्ण्यांचा कोणताच पंक्तिप्रपंच केला नाही. एवढेच नव्हे तर त्याने स्त्रियांचा सुद्धा भिक्खुणी संघ स्थापना केला व त्यांनाही पुरुषांबरोबर समानतेचा अधिकार दिला. अशाप्रकारे असमानतेवर आधारलेल्या चातुर्वर्ण्यांचा बिमोड करून व समानतेचा पुरस्कार करून बुद्ध जेव्हा आपल्या धर्ममतांचा प्रभाव