बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 420

ष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ad

लोकावर पाडू लागला तेव्हा साहजिकच हिंदू धर्माला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कार आप्टाणिटा करावा लागला. त्यासाठी हिंदू धर्माल' हिंसेचा त्यार करून बुद्धाने पुरस्कारलेली अहिंसा आत्मसात करावी व मांस भक्षणाचा त्याग करावा लागला. एदढेच नव्हे तर वेदप्रामाण्यालाही झुगारून देण्यास हिंदू धर्माने सिद्धता दर्शदिली, we छातुर्वण्यावरील पकड मात्र सोडावयास हिंदू धर्म तयार होऊ शकला नाही, बुद्धाला चातुर्वर्ण्यपद्धती मान्य नसल्याने तो सतत प्रतिकार करीत राहिला. ह्याच कारणास्तव जैन धर्मापेक्षा बौद्ध धर्माचा द बुद्धाचा हिंदू धर्मियांनी सदोदित द्वेष केला व वैरभाव बाळगला. चातुर्वर्ण्यांठिरूद्ध बुद्धाने उठविलेला आट'ज दाबून टाकण्यासाठी हिंदू धर्माने तार्किक दृष्टिकोनातून नव्हे तर तात्त्विक दृष्टिकोनातून चातुर्वर्ण्यांचे समर्थन करण्यास सुरवात केली. ह्या नाविण्यपूर्ण समर्थनाची उभारणी सर्वप्रथम भगवद्गीतेत करण्यात आली.

भर वद्रीतह' निश्चित कशाचा उपदेश करते हे कोण्णल'च नीट सांगत' येत नाही. we हे मात्र निश्‍चित आहे की, भगवद्गीता चातुर्वण्याचि पुरेपूर समर्थन करते वस्तुत: भगवद्गीता लिहिण्यामारो चातुर्वर्ण्यांचा पुरस्कार करण्याचा प्रमुख हेतू आहे. भगवदरगीतेने चातुर्वर्ण्यांचे समर्थन अशा कोणत्या नाविन्यपूर्ण पद्धतीने केलेले आहे ?

कृष्ण म्हणतो, “मी स्वतः परमेश्वर असल्याने ह्या चातुर्वण्याची उभारणी मीच केलेली आहे. ती गुणकर्माच्या तत्त्वप्रणालीवर आधारित आहे.' याचाच अर्थ असा की, प्रत्येक मनुष्याचे समाजातील स्थान व त्याचा व्यवसाय त्या त्या मनुष्ण'्च्या अंगीभूत गुणावर ठरविण्यात आलेला आहे. यावरून दोन गोष्टी उघडकीस येतात.

पहिली गोष्ट अशी की, गुणकर्मशः आधारित चातुर्दणर्यपद्धती ही नवीन तत्त्वप्रणाली म्हणून मांडली गेली आहे. पुरातन तत्त्व प्रणालीनुसार चातुर्वर्ण्य वेदप्रामाण्यावर आधारलेले आहे. वेद हे ईश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहेत. त्यामुळे वेदातून सांगितलेले चातुर्वर्ण्यसुद्धा इश्वरप्रणीत व अपरिवर्तनीय मानले गेले आहे. बुद्धाने वेदाच्या अपौरुषेयत्त्वावर व अपरिवर्तनशीलतेवर प्रहार केल्यामुळे पर्यायाने चातुर्वर्ण्यांवर सुद्धा प्रत्याघात करून त्याचा पुरातन पायाच उखडून टाकलेला आहे. याच कारणास्तद अविभाज्य वाटणाऱ्या चातुर्वर्ण्याला टिकविण्यासाठी हिंदू धर्माला भगवद्गीतेने पुरस्कारलेल्या तत्त्वप्रणालीचा नवीन व भक्कम आधार घेणे क्रमप्राप्त झाले. परंतु कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या ह्या नव्या तत्त्वाप्रणालीचे समर्थन कितपत योग्य आहे ? बऱ्याच हिंदू धर्मियांना ही तत्त्वप्रणाली अत्यंत समर्थनीय व निरुत्तर