बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 421

बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३७९

करणारी वाटते. एवढेच नव्हे तर अहिंदूंन' सुद्धा ती सत्य व विलोभनीय वाटते. चातुर्टण्य हे केवळ वेदप्रामाण्यावर अवलंबून ठेवले गेले असते तर ते कधीचेच पूर्णणणे रसातळाला गेले असते. अशी माझी पक्की खात्री आहे. भगवद्गीतेने केलेले शाश्वत जीवनाचा सत्याभास निर्माण करणारे चातुर्वणर्यांचे नवे समर्थन अत्यंत दिशाभूल करणारे व चुकीचे आहे. कारण ह्य नव्या समर्थनानेच जातीसंस्थेला जम दिलेला आहे.

चातुर्वर्ण्याचा हा नवीन सिद्धांत मुळातून सांख्य दर्शनापासून घेतलेला आहे. श्रीकृष्णाने तो काही मूलभूत असा सांगितलेला नाही. चातुर्वरण्याला पाठबळ देण्यासाठी त्याने सांख्य तत्त्वज्ञानापासून उसणवारी केलेली आहे. परंतु ही उसणवार करताना मात्र त्यात त्याने आपल्या कल्पनेनुसार अनेक युक्तिवाद घुसडलेले अहेत. सांख्य तत्त्वज्ञानाचा उद्घोषक कपिल ह्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारले होते. वस्तू जर अजड मानली गेली तर ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याचे काहीच कारण पडत नाही. वस्तू जड नाही; ती अजड आहे; अस्थिर आहे. वस्तू ही रज, तम व सत्व ह्या तीन गुणांनी परिपूर्ण असते. प्रकृती ही ह्या तीन गुणांच्या संठुलनामुळे जड भासत असते. तीन गुणांपैकी एक गुण जरी इतर दोन गुणांपेक्षा प्रबळ झाला तरी प्रकृतीतील समतोलपणा बिघडून तिच्यात क्रियाशीलता निर्माण होते. हेच सांख्य तत्त्वज्ञानाचे सार होय. या सिद्धान्ताबाबत कोणताच वाद असू शकत नाही. हा सिद्धांत बहुतेक खराही आहे. व्यक्तिगत प्रत्येकजन प्रकृतीचाच घटक असल्याने सत्व, रज व तम ह्या त्रिगुणांनी परिपूर्ण असतो. एवढेच नव्हे तर या तीन गुणांत परस्परांवर प्रभुत्व मिळविण्याची अहमहमिका लागत असावी हे सुद्धा मान्य केले जाऊ शकते. परंतु एखाद्या व्यक्तीतील विशिष्ट गुण जन्माच्या वेळी इतर दुसऱ्या गुणांवर प्रभुत्व मिळवून सर्वकाळच नव्हे तर मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत सातत्याने वास करीत राहील, हे कसे मान्य केले जाऊ शकते ? या अनुमानाल' सांख्य तत्त्वज्ञानात किंवा प्रत्यक्ष अनुभवात कुठलाच आधार नाही. ज्या वेळेस कृष्णाने गुणकर्मशः चातुर्वर्ण्याची कल्पना ग्राह्य मानली त्यावेळेस जर हिटलर किंवा मुसलोनी जन्माला आले असते तर एक रंगाय्याचा पोर व दुसरा गवंड्याचा पोर जंगाला नमविणारे हुकूमशहा कसे झाले याचे कोडे उलगडण्यास श्रीकृष्णाला सुद्धा कठीण गेले असते.

वस्तूशी निगडित असणारी अशी एक बाब आहे. ती ही की, व्यक्तिमात्रागणिक प्रकृती सतत बदलत असते. कारण गुणांची सापेक्ष स्थितीसुद्धा परिवर्तनशील आहे. प्रभुत्व मिळविण्याच्या सापेक्ष स्थितीत गुण जर सदोदित बदलत असतील