बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३८१
वाटते. या सगळ्या प्रवृत्तींचा एकच परिणाम होणार आहे. कालांतराने हिंदू धर्म लय पावणर आहे ; जीवनधारणेस अयोग्य बनणार आहे. हिंदू धर्मात अशी काही पोकळी निर्माण होणार आहे की, जिच्या परिणामामुळे हिंदू धर्माचे शतशः तुकडे होणार आहेत. ही स्थिती आल्यावरच हिंदूचे डोळे खाडकन उघडतील व इतःपर काहीतरी विधायक व सुयोग्य पाऊल उचलले पाहिजे असे त्यांना वाटू लागेल. मला खात्री आहे की त्यावेळेस त्यांचे पाऊल निश्चितपणे बौद्ध धर्माकडे वाटचाल करू लागेल. बौद्ध तत्त्वज्ञानच त्यावेळेस त्यांची जीवनधारणा शाबूत ठेवण्यास मार्गदर्शक ठरेल. हाच एक आशेचा एकमेव किरण हिंदूंचे जीवन प्रफुल्लित करणारा आहे. एवढेच नव्हे तर अनेकविध मार्गांनी त्यांचे जीवन सुफलिल करण्यास बौद्ध धर्मच कारणीभूत ठरणार आहे.
आज प्रत्येक धर्माला एका प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे. पीडित व पददलित जनतेचा मानसिक व नेतिक अभ्युदय घडवून आणण्याचे सामर्थ्य कोणत्या धर्मात आहे ? आज हयात असणाऱ्या धर्मात अशाप्रकारचे सामर्थ्य नसेल तर तो धर्म कुचकामी होय: | |
लाखो दलित व अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांची मानसिक व नैतिक स्थिती हिंदुधर्म म्हणविणारा धर्म सुधारू शकतो काय ? दुर्दैवाने याचे उत्तर ' नाही ' असेच म्हणावे लागते. मग ह्या लाखो दलित व अस्पृश्य लोकांनी हिंदू धर्मातच खितपत पडून राहावे अशी अपेक्षा हिंदूंनी करावी काय ? ही अपेक्षा सर्वथा अयोग्य होईल. खरे पाहता हिंदू धर्म आज ज्वालामुखीच्या तोंडाशी रेंगाळत आहे. आज जरी हिंदू धर्माचे अस्तित्व दिसत असले तरी कधी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो रसातळास पोहचेल याची शाश्वती नाही. कारण लाखो पददलित लोकांची अस्मिता जेव्हां जागृत होईल व आपल्या अधोगतीस हिंदू धर्मच कारणीभूत झाला हे कटु सत्य त्यांच्या नजरेस पडेल तेव्हा अनावर विद्रोहाची लाट. हिंदू धर्माला नेस्तनाबूत करून टाकील. या संबंधात इतिहासाचा मागोवा घेतला तर रोम साम्राज्यात मूर्तीपूजा मानणाऱ्या व गुलामगिरीचा कडाडून पुरस्कार करणाऱ्या सनातनी धर्माचा पाडाव खिस्ती धर्माने कसा केला ह्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. अनुचित रूढीप्रिय सनातनी धर्म जेव्हा सर्वसामान्य जनतेला मानसिक व नैतिक स्वातंत्र्य बहाल करू शकत नाही, हे पाहिल्यावरच रोम साम्राज्यातील लोकांनी खिस्ती धर्म स्वीकारला. रोम साम्राज्यात जे घडले त्यांच इतिहासाची पुनरावृत्ती भारतात देखील निश्चितपणे होणार आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला सत्याची ओळख पटेल तेव्हा ती जनता
आपोआपच बौद्ध धर्माचा मार्ग चोखाळणार आहे. |
वाय ६४१- > ७