बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 427

बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३८५

बौद्ध धर्मात सांगितलेल्या आदर्श तत्त्वप्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण

करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीतितत्त्वांनी वागण्यास कार्यप्रवृत्त करणे व

प्रापंचिक लोकांपुढे स्वत:च्या आदर्श वागणुकोचा एक उत्तम नमुना ठेवणे हे प्रमुख

हेतू बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामागे होते. सर्व सामान्य माणसाला बौद्ध

तत्त्वज्ञान सहजासहजी आकलन होणारे नाही; याची कल्पना बुद्धाला होती. तथापि

ते त्यांनी थोडे फार समजावून घ्यावे व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर बौद्ध

विचारप्रणालीशी बद्ध असलेला सुसंघटित बौद्ध मिक्खूचा आदर्श संच असावा, हे

भिक्खू संघाच्या निर्मितीचे कारण होय. याच कारणास्तव विनय नावाच्या आदर्श

नियमांनी भिक्खू संघाला बद्ध केले गेले. तथापि बौद्ध भिक्खू संघ स्थापनेच्या

वेळी बुद्धाच्या मनात दुसरे अनेक हेतू होते. सर्वसाधारण लोकांना सत्य आणि

निरपेक्ष मार्गदर्शन देणाऱ्या बुद्धिवादी लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे असे

बुद्धाला वाटत होते. भिक्खू संघाने निरपेक्षपणे जनसेवा करावी हा प्रमुख उद्देश

लक्षात घेऊन भिक्खूने स्वत:ची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केला

होता. मालमत्तेची धारकवृत्ती मनुष्याच्या स्वतंत्र विचार प्रेरणेला व विचार

प्रवृत्तीला बाधा आणत असते व मोठ्यात मोठा अडथळा निर्माण करीत

असते. मालमत्तेची धारकवृत्ती जशी घातक असते तसेच भिक्खूने विवाह करून निरपेक्ष जनसेवा करणे कदापि शक्य नसते. यास्तव सामाजिक बंधनात गुरफटून न राहता जनसेवेस तनमनधनाने मुक्त राहण्यासाठी भिक्खूने विवाह करू नये असा निर्बध बुद्धाने घातला होता.

या सर्व आदर्शाप्रमाणे आजचा भिक्खूसंघ राहतो काय ? ` ह्या प्रश्‍नाचे स्पष्ट उत्तर नकारार्थी आहे. भिक्खुसंघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीच, परंतु जनसेवाही करीत नाही. सद्यपरिस्थितीतील भिक्खुसंघ बौद्ध धर्म प्रसारासाठी निरुपयोगी आहे. आज जगभर भिक्खूंची संख्या अफाट आहे. त्यात केवळ साधू व संन्यासवृत्तीने राहणाऱ्या भिक्खूंचाच भरणा जास्त आहे. ते सगळे आपला वेळ नुसत्या ध्यानात किंवा आळसात घालवितात. लोकांना ज्ञान द्यावे किवा त्यांची सेवा करावी ही वृत्तीच भिक्खूंत राहिलेली नाही. सेवावृत्तीच्या संदर्भात विचार करता कोणाच्याही मनात सर्वप्रथम रामकृष्ण मिशन उभी राहते. पण भिक्खूचे खरे कर्तव्य सेवावृत्ती असूनसुद्धा कोणालाही भिक्खूसंघाची

आठवण होत नाही. मग अशा स्थितीत कोणाची सेवावृत्ती आदरणीय

मानावी ? भिक्खूसंघाची की रामकृष्ण मिशनची ? आज भिक्खूसंघ नुसत्या आळशी लोकांचे एक मोठे सैन्य झाले आहे. आज भिक्खू थोडे जरी असले तरी चालतील, परतु ते सुशिक्षित व कार्यप्रवण पाहिजेत. ते ऐतखाऊ व ऐदी