आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३८६
प्रेरणा घेण्यास जेसुइट खिस्ती पाद्र्यांपासून नसावेत. ह्या बाबतीत भिक्खुसंघाने
धर्माचा प्रसार आशियाभर शैक्षणिक व कसलीच हरकत नसावी. त्यांनी खिस्ती
धर्माचे गुणगानच गाइले नाही. त्यांनी वैद्यकीय सेवेने केला. त्यांनी केवळ खिस्ती
त्याबरोबर कला व विज्ञान ह्यांची सुंदर सांगड घालून त्यांचाही त्यांनी प्रसार केला. पुरातन काळातील बौद्ध भिक्खूंचा सुद्धा हाच आदर्श होता. जगभर गाजलेली नालंदा! व तक्षशिला* ही विद्यापीठे भिक्खूंशी स्वतः चालविलेली होती. तिथेच ते भिक्खू राहत व ज्ञानपठन करीत. साहजिकच ते सुशिक्षित व बुद्धिमान असत. स्वधर्ममतांच्या प्रसारासाठी समाजाची सेवा करणे अत्यावश्यक आहे ह्याची त्यांना जाणीव होती. सध्याच्या भिक्खूंनी त्याच जुन्या आदर्श
विचारांची कास धरावयास पाहिजे.
भिक्खुसंघाची आजची जडणघडण पाहता बौद्ध भिक्खूसंघ सर्वसामान्य लोकांची सेवा करू शकेल असे म्हणवत नाही. त्यामुळे बौद्ध भिक्खूसंघ स्वतःकडे लोकांना आकर्षित करू शकंत नाही. भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्धधर्म वृद्धिगत होणे कठीण आहे. शिक्षणप्रसाराबरोबर आज धर्मप्रसारसुद्धा होणे आवश्यक आहे. धर्मप्रसार मनुष्यबळाशिवाय व द्रव्यबळाशिवाय होऊ शकणार नाही. हेही तेवढेच खरे आहे; परंतु हे बळ कोण पुरवू शकेल ? अर्थात ज्या देशात आज बौद्धधर्म प्रचलित आहे ते देशच ही गोष्ट करू शकतात. ह्या बौद्धधर्मी देशांनी सुरुवातीस काही प्रमाणात मनुष्यबळ व द्रव्यबळ पुरविल्यास बराच कार्यभाग साधला जाऊ शकतो. परंतु ही गोष्ट ते करू शकतील काय ? सद्यपरिस्थिती लक्षात घेता बौद्धधर्म प्रसाराच्या बाबतीत ते देश उत्साही असल्याचे दिसत नाहीत. उलट ते काहीसे उदासीन असल्याचे
दिसतात.
वस्तुतः सध्याचा काळ बौद्ध धर्म प्रसार होण्यास खूपच अनुकूल असल्याचा दिसून येतो. पूर्वी एक काळ असा होता की, धर्म हा मनुष्याचा वारसा हक्कांचा एक भाग होता. मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या संपत्तीबरीबर
त्यांचा धर्मही वारसातील एक भाग म्हणून स्वीकारीत असे. धर्माचा हा
वारसाहक्क घेताना त्या धर्मात उचित अनुचित काय आहे, ह्याची सुद्धा
चिकित्सा केली जात असे. इस्टेटीच्या बाबतीत ती घेण्याजोगी आहे किंवा नाही
असा प्रश्न कधी कोणी विचारी. परंतु धर्माच्या बाबतीत तो धर्म स्वीकारण्याजोगा
आहे किंवा नाही असा चुकूनही प्रश्न केला जात नसे. परंतु आज काळ फारच
1 पाहा, परिशिष्ट क्रमांक : २३
A पाहा, परिशिष्ट क्रमोक : २४