बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 429

बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३८७

बदलला आहे. साऱ्या जगभर बऱ्याच लोकांनी त्यांच्या धर्माच्या वारसाहक्काच्या

बाबतीत असामान्य असे धैर्य दाखविलेले आहे. वाडवडिलांचा धर्म म्हणून

स्वीकारलाच पाहिजे, ह्या बंधनाला त्यांनी झुगारून दिलेले आहे. काहींनी तर

फारच क्रांतिकारक. विचार दर्शविले आहेत काही लोक .वैज्ञात्तिक, ज्ञानाने

भारावून जाऊन धर्म कुचकामी आहे, धर्मात काही तथ्यांश नसंतो, तो टाकून फेकून

दिला पाहिजे ह्या निर्णयापर्यंत पोहचले आहेत. . काही लोक माक्सवादी!

विचारसरणीमुळे धर्म ही श्रीमंतांच्या प्रभुत्वाला शरण जाण्यास गरिबांना प्रभावित करणारी अफूची. गोळी, आहे म्हणून धर्म झुगारून द्यावा असे म्हणू लागले आहेत. कोणतेही कारण का असेना मात्र हे सत्य आहेकी, लोकांनी आज धर्माच्या बाबतीत चिकित्सक बुद्धीची वाढ केलेली आहे. . जे. लोक वैचारिक पातळीवर. ऊहापोह करण्याचे धाडस दाखवितात त्यांच्या मसांत प्रामुख्याने हेच प्रश्‍न उद्भतात की धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय ? आणि आवश्यक: असेल तर कोणता धर्म योग्य आहे ?

ही वैचारिक भूमिका लक्षात घेऊन असेच म्हणावे लागते की, वेळ येऊन ठेपलेंली आहे. प्रश्‍न फक्त इच्छेचा आहे. आज बौद्ध धर्मी देशांनी मनावर घेतले व लोकांची मनोभूमिका जाणून घेतली तर बौद्धधर्म जगभर पसरण्यास व त्याची वाढ होण्यास मुळीच कठीण जाणार नाही. केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्यूत राहणे हे खऱया बौद्धाचे लक्षण नव्हे. बौद्धधर्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या व आदर्श बौद्धाचे कर्तव्य होय. बौद्धधर्माचा प्रचार व प्रसार करणे म्हणजेच मानवजातीची सेवा करणे होय. ही बाब बोद्ध राष्ट्रांनी ध्यानात घेतली तर मला विशवास वाटतो की बौद्धधर्म वृद्धीची लाट कधीही थोपविली जाऊ शकणार नाही.

Tore, परिशिष्ट क्रमांक : २५ बुद्ध, मार्क्स आणि धम्माचे भवितव्य-रत्नमित्रा गणवीर,

पृ. ९-२८.