39७
ब्राह्मणेतर वर्गाने म. फुले यांची स्मृति पुसूनच टाकली
कोल्हापूर, ता. २९ मे १९५०--सत्यशोधक समाज परिषदेचे निमित्ताने सदर परिषदेचे पुढारी श्री. भास्करराव जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पत्र पाठविले आहे. सदर पत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात: 'ब्राह्मणेतर anit म. फुले यांची स्मृति पुसूनच टाकली आहे असे नसून या वर्गाने त्यांच्या तत्वज्ञानास निर्लज्जपणे दगा दिला आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य लाभले पण या स्वातंत्र्याचा खरा फायदा जर हिंदी जनतेला व्हायचा असेल तर या जनतेच्या मानेवर बसलेले. भोळ्या समजुतीचें जोखड झुगारुन दिले पाहिजे व हे महत्वाचे कार्य सत्यशोधक समाजाने करणे अगत्याचे असल्याचेंहि डॉक्टर महाशयांनी सदर
पत्रांत नमूद केले आहे.
शी
जनता : ३ जून १९५०.