हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 431

१०८
हिंदु स्त्रियांची उन्नती आणि अवनती [: ]
जबाबदार कोण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “The Rise and fall of the Hindu Women : Who was responsible for ? " या शीर्षकाच्या ' महाबोधी ' नियतकालिकाच्या मे-जून १९५१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी लेखाचा हा अनुवाद--संपादक.

' इव्हज विकली ' च्या जानेवारी २१, १९५० च्या अंकात भारतीय स्त्रीच्या अवनतीला मुख्यतः बुद्धाची शिकवण कारणीभूत असल्याचा आरोप करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. ह्या आरोपाचे खंडन करण्याच्या उद्देशाने लामा गोविंद यांनी लिहिलेला ' स्त्रियांचे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यातील स्थान ' या शीर्षकाचा इंग्रजीतील लेख* ' महाबोधी ' नियतकालिकाच्या मार्च १९५० च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. अशा आरोपाचे खंडन करणे प्रत्येक बौद्ध धर्मीयाचे कर्तव्य आहे व ते लामा गोविद यांनी पार पाडले. परंलु हा प्रश्न येथेच संपविता येणार नाही. बुद्धावर आरोप करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हे. बुद्धाची महानता ज्यांना सहन होत नाही अशा, ' ईव्हज विकली ' च्या लेखकापेक्षाही अधिक अधिकारवाणी असलेल्या हितसंबंधी लोकांकडून असे आरोप सहसा केले जातात. त्यामुळे या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन वारंवारं होणाऱ्या अशा आरोपाचा मूलत: शोध लावणे अगत्याचे आहे. मला खात्री आहे की हा आरोप खूप गंभीर आणि तिरस्करणीय असल्यामुळे त्याचा आणखी शोध घेण्याचे

महाबोधी 'चे वाचक स्वागत करतील

बुद्धाच्या विरुद्ध होणाऱ्या या आरोपाला फक्त दोन ठिकाणी आधार मिळू शकतो -— |

पहिला संभाव्य आधार ' महापरिनिब्बाण सुत्ता ' च्या प्रकरण पाच मध्ये आनंदाच्या प्रश्नाला बुद्धाने उत्तर दिले, असे जे, सांगितले जाते, तो असू

शकतो. तो येणे प्रमाणे :--

“९. * स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे ? ' आनंदाने विचारले.

' आनंदा, जणू त्यांना बघत सुद्धा नाही, असे. '

rT

* Reprinted in Dr. Babasaheb Ambedkar Writings and speeches, Volume 17, Part

Two, Appenarx-!!, P. p. 495-498—Editors.