हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 432

३२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

' परंतु त्यांना पाहावे लागलेच तर आम्ही काय करावे ? '

' आनंदा, बोलू नये. '

' परंतु त्या आमच्याशी बोलल्याचं तर भगवंत, आम्ही काय करावे?'

आनंदा, तुम्ही सर्वोपरी जागरुक असावे. “

ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने प्रकाशित केलेल्या 'महापरिनिब्बाण सुत्ता' च्या मूळ भागात प्रस्तुतचा भाग पाहायला मिळेल हे नाकारता येणार नाही. परंतु प्रस्तुत उतारा प्रत्यक्ष त्यात आहे किंवा नाही, हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की प्रस्तुत उताऱ्याच्या आधारावर जर एखाद्या युक्तिवादाची उभारणी होत असेल तर तो संबंधित उतारा हा मूळचा तसेच खरा असून नंतरच्या काळात भिक्खूंनी तो प्रक्षिप्त केलेला नाही हे सिद्ध करण्याची गरज नाही काय ?

खोट्या गोष्टीचे. आवरण चढवून, त्यात मूळ बौद्ध विचारांशी अगदीच परकीय असलेल्या. ब्राह्मणी विचारांची भर घालून, तसेच मठशाही विचारांना. प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, सुत्तपिटकाला संपूर्णपणे विद्रूप करण्यात आलेले आहे. ज्याला भगवान बुद्धाची मूळ शिकवण माहीत आहे, तो असे सुत्तपिटक वाचून वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर मिसेस Pee डेव्हिड्स ' यांना झालेल्या आश्चर्यात तो सहभागी होईल आणि विचारील :--

“ सुत्तपिटकाच्या या भागामध्ये बुद्धाचे विचार कुठे आहेत ? यापैकी

किती भागामध्ये बुद्धाचे मूळ विचार स्पष्टपणे मांडल्या गेलेत आणि किली

भागामध्ये उत्तरोत्तर वर्षानुवर्ष झालेले निवेदक, स्मृतिबद्ध तसेच कंठस्थ

करणारे बहुसंख्य शिक्षक, तसेच मौखिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, ही सर्व

शिकवण, जी क्लिष्ट होती ज्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागत होते,

इतकेच नव्हें तर कधीकाळी संपादकांनी ती संपादित केल्यानंतर इतक्या

वर्षांनी तंतोतंतपणे कशी मांडली जावू शकते ? हे सर्व निवेदक, शिक्षक

तसेच संपादक यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श समाजातील इतर

लोकांपेक्षा अत्यंत वेगळे होते आणि काही तर बौद्ध जगताशी संबंधितही

नव्हते. अशा सर्व विपर्यस्त माध्यमांचे कोणीही अध्ययन करावे आणि या

वचनासंबंधी स्वतःशी विचारावे की ही शिकवण ज्या व्यक्तीने संपादीत

केली, त्याने सर्वमान्य शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकडून वदवून आणि

तेच सत्य असल्याचे दर्शविले-जाण्याची शक्यता नाही काय ?

` Preface (xiii) to Kindred Saying, Vol. If.