3९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
9g. बंधुनो, आनंदामध्ये चार अतुलनीय आणि स्फुर्तिदायक सद्गुण
अप्हेत.
तर बंधुंनो, संघातील भिक्खू आनंदाला भेटण्यासाठी येत असत. त्याला
भेटल्यानंतर ते प्रफुल्लित होत असत. आनंद जेव्हा त्यांना धम्म शिकवित
असे तेंव्हा प्रवचन ऐकतानाही ते आनंदविभोर व्हायचे. आणि बंधुँनो, आनंद
जेव्ह! मौन असे त्यावेळी मात्र ते अस्वस्थ होत असत.
आणि बंधुनो, संघातील भिक्खूणी . . . . किंवा धम्मोपासक . . . .
धम्मोपासिका त्याला भेटल्यानंतर आणि आनंदाने त्यांना धम्म शिकविल्यानंतर
ते प्रफुल्लित होत असत. आणि बंधुनो, आनंद मौन असताना मात्र ते
अस्वस्थ होत असत. "'
यावरुन हे स्पष्ट होते की आनंदाचे स्त्रियांशी भेटणे, इतकेच नव्हे तर ज्या धम्मोपासिका संघाच्या सदस्या नव्हत्या अशांनाही भेटणे ही नित्याची व सामान्य बाब होती. तो त्यांना पाहात असे; भेटत असे आणि त्यांच्याशी बोलत असे. असे असतानाही आनंदाने असा प्रश्न का विचारला ? स्त्रयां आनंदाला भेटतात हे बुद्धाला माहीत होते. त्यांनी या संबंधी कधीही हरकत घेतली नव्हती. असे असतानाही बुद्धाच्या मनात स्त्रियांशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा तसेच प्रतिबंधीत करण्याचा विचार का आला असावा ? हा संपूर्ण भाग इतका कृत्रिम आहे की तो नंतरच्या काळात मठशाहीने प्रक्षिप्त केल्याचा प्रकार आहे हे निश्चित समजावे.
आनंदाच्या जीवनातील अत्यंत विरोधाभासी असा प्रसंग महापरिनिब्बाण सुत्ताच्या संबंधित भागात् आलेला आहे.
हे सर्वविदित आहे की, पहिल्या संगितीत (परिषदेत) आनंदाच्या विरोधात पाच तक्रारी करण्यात आल्या. त्या अशा :--
(१) बुद्धाच्या मतानुसार विनयातील कोणत्या भागात फेरफार आणि
दुरुस्ती करण्याचा अधिकार संघाला दिला हे विचारण्यात तो अपयशी ठरला. :
(२) भगवंताचे चिवर शिवता शिवता मागे सरताना त्याचा चिवरावर पाय
पडला.
(३) भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पार्थिवाला स्त्रियांना प्रथम
वंदन करण्याची परवानगी देऊन त्यांच्या अश्रुमुळे भगवंताच्या पार्थिवाच्या
झालेल्या विटबनेस तो कारणीभूत आहे.