हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 435

हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती ..... जबाबदार कोण? ३९३

(४) भगदंताला अंधिक जगण्यासाठी तो बोलला नाही.

(५) स्त्रियांचा, संघात प्रवेशासाठी तो तत्वत: कारणीभूत होता.

आनंदाने हे सर्व आरोप कबूल केले.

त्याने हे आरोप मान्य करणे किंवा नाकारणे ही बाब वेगळी आहे. महत्त्वाचा

आहे तो तिसरा आरोप. सध्याच्या चर्चेतील तो महत्त्वाचा मुद्दा

आहे. महापरिनिब्बाण सुत्तात उल्लेखिलेला भगवंताचा उपदेश सत्य आहे ही

जर वास्तविकता असेल तर आनंदाने भगवंताच्या पार्थिवाला स्त्रियांना स्पर्श का

करू दिला ? बुद्धाने थोड्याच वेळेपूर्वी केलेल्या उपदेशाची त्याने इतक्या

उघडपणे आणि जाणीवपूर्वक अवहेलना केली असती काय? याचे उत्तर

निश्चितपणे नकारात्मक असेल. या नकारात्मक उत्तरातून काय निष्पन्न

होते ? त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपाप्रमाणे बुद्धाने असा काही

उपदेश केलाच नव्हता हेच निष्पन्न होते. आणि जर बुद्धाने असा उपदेश

केलाच असता तर आनंद त्या विरोधात वागला नसता. यावरून नि:संदिग्धपणे

असे म्हणता येते की असा कोणताही उपदेश बुद्धाने केलेला नव्हता.

या प्रश्नासंबंधी बुद्धाचा दृष्टिकोन विचारात घेता बुद्धाने स्वाभाविकरित्या असे

उत्तर दिले असते काय ? बुद्धाची स्त्रियांप्रति असलेली वागणूक हेच या

प्रश्नाचे उत्तर आहे. बुद्धाने आनंदाला उपदेश केल्याचे जे सांगितल्या जाते

त्याप्रमाणे स्त्रियांना भेटण्याचे टाळले होते काय ? वस्तुस्थिती काय आहे ?

दोन प्रसंग नजरेसमोर त्वरीत येतात. त्यातील एक विशाखाचे आहे. बुद्धाच्या

- ऐशी प्रमुख शिष्यांपैकी ती एक होती आणि '" दानदात्यांची प्रमुख “ या पदवीने

तिचा गौरव होता. विशाखा कधीकाळी बुद्धाचे प्रवचन ऐकावयास गेली नव्हती काय ? तिने त्यांच्या संघारामात प्रवेश केला नव्हता काय? बुद्धाने आनंदाला स्त्रियांशी जसे वागण्याचा उपदेश केल्याचे सांगितले जाते तसे बुद्ध विशाखासोबत वागले होंते काय ? प्रवचनासाठी उपस्थित असणाऱ्या भिक्खूनी त्यावेळी काय केले ? त्यांनी प्रवचनातून बहिर्गमन केले होते काय ?

दुसरा प्रसंग नजरे समोर येतो तो वैशालीच्या आम्रपालीचा. ती बुद्धाला मेटायला गेली आणि तिने त्यांना तसेच त्यांच्या भिक्खूंना भोजनासाठी तिच्या प्रासादात येण्याचे निमंत्रण दिले. ती एक वारांगणा होती. ती वैशालीतील सर्वात देखणी स्त्री होती. बुद्धाने आणि भिक्खुंनी तिला टाळले होते काय ? याचवेळी लिच्छवींने दिलेले निमंत्रण नाकारल्यामुळे त्यांना (लिच्छवींना) खूप अपमानीत झाल्यासारखे वाटले असतानाही, बुद्धाने. तिचे निमंत्रण स्वीकारले आणि तिच्या प्रासादात जाऊन तिने दिलेल्या भोजनात सहभागी झाले. |