हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 436

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३९४

सुत्तात ' याशिवाय आणखी उदाहरणांची गरज भासत नाही. नंदकोवद

असताना त्यांच्याकडे महाप्रजापती सांगितल्याप्रमाणे बुद्ध श्रावस्ती येथे वास्तव्यास

गौतमी आपल्या सोबत पाचशे दानी-स्त्रियांना घेऊन आली. तिने बुद्धाला धम्मासंबंधी मार्गदर्शन करण्यास विनंती केली असताना बुद्धाने त्यांच्यापासून

पलाघन केले होते काय ?

संयुक्त निकायात २ नमूद आहे की पज्जुनाची कन्या कोकानदा, जिच्या सौंदर्याचे तेज संपूर्ण महावनात पसरले होते. ती बुद्धाचे वास्तव्य वैशालीला असताना प्रातः समयी त्यांना भेटावयास आली होती.

राजा प्रसेनजीतची पत्नी राणी मल्लीका धम्मासंबंधीच्या उपदेशासाठी बुद्धाकडे वारंवार येत असल्याचे उल्लेख reamed ठिकठिकाणी आहेत.

या घटनांवरून हे स्पष्ट आहे की बुद्धाने स्त्रियांना भेटण्यासंबंधी प्रतिबंध केला नव्हता तसेच स्त्रियांना बुद्धाकडे जाण्याकरिता संकोच वाटत नसे.

स्त्रियांशी होणाऱ्या वारंवार भेटी आणि मानवी स्वभावातील कमकुवतपणा लक्षात घेता बुद्धाने भिक्खूंना सामान्य अनुयायांच्या घरी वारंवार भेटी न देण्याचा

उपदेश ? केला होता हे खरे आहे. परंतु त्यांनी अशा भेटीवर प्रतिबंध घातला

नव्हता किंवा त्यांनी स्त्रियांविषयी कधीही तिरस्कार दर्शविला नव्हता.

ब्रह्मचर्य पाळण्यासंबंधी बुद्धाची टोकाची भूमिका होती हेही तितकेच खरे आहे. त्यांच्याच शब्दात. * “ ब्रह्मचर्याचे जीवन कलंकित करण्याकरिता स्त्रियां कारण ठरु शकतात. '' या सत्य गोष्टी विषयी बुद्ध अत्यंत जागरूक होते. पण त्यांनी

कोणता उपदेश केला ? स्त्रियांशी असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडण्याकरिता बुद्धाने भिक्खूंना उपदेश केला होता काय? मुळीच नाही. त्यांनी असा

कोणताही प्रतिबंध लावला नाही. असे करेण्याऐवजी त्यांनी भिक्खूंना सांगितले की जेंव्हा केंव्हा ते कोणत्याही स्त्रीशी भेटतात तेंव्हा त्यांनी आपल्या मनात व्यक्तिनुरुप माता, भगिनी आणि कन्या असल्याची भावना * बाळगावी ; म्हणजेच तुम्ही प्रसंगानुरूप स्वतःच्या माता, भगिनी आणि कन्या सारखे त्या स्त्रीला

समजावे.

स्त्रियांच्या भिक्खू संघातील प्रवेशास तसेच त्यांचा संघ बनविण्यास बुद्धाचा _ विरोध होता. (सरतेशेवटी त्यांनी परवानगी दिली) आणि भिक्खू संघापेक्षा

© Majjhma Nikaya, ||, P. 309.

२: Vol. 1. P. 40.

3: Anguttara Nikaya lll. P. 190.

4

> Samyutta Nikaya |. P. 53.

> Kindred Sayings IV. P. 68.