३९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
एहिल्या प्रश्नावर, स्त्रियांचा संघ पुरुषांच्या संघापासून स्वतंत्र असावा याशिवाय दुसरा निर्णय शक्य नव्हता दोघांनाही बंधनकारक असणाऱ्या ब्रह्मचयच्या नियमाची ही अनिवार्य निष्पत्ती होती. पुरुष तसेच स्त्री या दोघांच्याही जीवनात उपजत, नैसर्गिक वैषयिक वासनेचे स्थान किती प्रभावी आहे, याची बुद्धाला जाणीव होती. बुद्धाच्याच शब्दाचा उपयोग करावयाचे झाल्यास ही वासनः पुरुषाल' स्त्रीच्या आणि स्त्रीला पुरुषाच्या दास्यत्वाकडे ओढते. या प्रभावाला, थोडीही संधी दिली, तर ब्रह्मचर्याचा नियम एका क्षणासाठीही अस्तित्वात राहू शकणार नाही. ब्रह्मचर्याच्या नियमाचे संरक्षण करण्याकरिता त्यांना दोन स्वतंत्र संघाची योजना करावी लागली.
दुसऱ्या प्रश्नाचा विचार करता, बुद्धाने घेतलेल्या निर्णयाव्यतिरिक्त दुसरा निर्णय घेणे शक्य होते काय ? ज्या स्त्रियांनी त्यांचा धम्म स्वीकारला त्या अपरिपक्व स्त्रियां होत्या. त्याना धम्मतत्त्वज्ञानाची शिकवण देणे तसेच, संघाच्या नियमांबाबत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे होते. ही जबाबदारी कोण घेऊ शकले असते ? दुसऱ्या कोणाला त्यांनी हे कार्य सोपविले असते ? त्यांच्या संघातील पुरुष भिक्खूंशिवाय इतर कोणावरही नव्हे. कारण धम्मतत्त्वज्ञानाची शिकवण देऊन संघाच्या नियमाबाबत त्यांना आधीच प्रशिक्षित करण्यात आले होते. आणि त्यांनी नेमके हेच केले. भिक्खुणींना प्रशिक्षित करण्याची जबःबदारी Pager सोपविण्याकरिता त्यांच्यातील कोणते संबंध सुदृढ करण्यात आले ? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय भिक्खू संघापेक्षा भिख्खुणी संघ दुय्यम स्थानी असण्याचे स्पष्टीकरण होत नाही. या प्रश्नाचे उघड उत्तर असे की, भिक्खूणींना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी भिक्खूंकडे सोपविल्यावर त्यांच्यातील नाते, शिक्षक आणि विद्यार्थी असे राहील. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यात विद्यार्थ्याच्या प्रती शिक्षकांना काही अधिकार आणि शिक्षकांच्या प्रती विद्यार्थ्यांनी अधीनतेची आणि दुय्यमतेची भूमिका घेणे अंतर्भूत नाही काय ? यापेक्षा बुद्धाने वेगळे काय केले ?
या संदर्भात खिश्चन चर्चमधील पादरी आणि मादरी यांच्यातील संबंधाची तुलना करणे सोयीचे होईल. मादरी, पादरीच्या तुलनेत दुय्यम नाहीत काय ? अर्थातच त्या आहेत. * यावरून कुणी असे म्हणू शकेल काय की खिश्चन धर्म पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखतो ? भिक्खू आणि भिक्खूणी मधील संबंध नियमित करण्यासाठी बुद्धाने जर काही व्यवस्था केली असेल तर
त्याचा वेगळा अर्थ का लावण्यात यावा ?
1 See Article “ Nuns” in the Catholic Encyclopaedia. Vol. XI. २, 164.