हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 439

हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती ..... जबाबदार कोण ? ३९७

जेथपर्यंत सुत्तपिटकाचा संबंध आहे, तेथपर्यंत बुद्धाचा स्त्रियांच्या प्रती

पक्षपाती दृष्टिकोन होता आणि पुरुषांनी त्यांच्यापासून सावध असावे असे आग्रही

प्रतिपादन करण्याच्या आरोपाला कुठलाही आधार नाही.

>.

विशिष्ट घटनांना बाजूला ठेवून gern स्त्रियांकडे पाहण्याचा सर्वसामान्य दृष्टिकोन काय होता याकडे वळू या. स्त्रियां नीम्न दर्जाच्या आहेत अशी बुद्धाची धारणा आहे काय ? मला खात्री आहे की, बौद्धांच्या श्रेष्ठ साहित्यात बुद्धाने स्त्रीवर्गासंबंधी केलेले उल्लेख जो कोणी वाचील त्यावरून त्याची खात्री पटेल की, स्त्रियांना खालच्या पायरीवर जावे लागेल असे काहीही करणे तर दूरच उलट, स्त्रियांना उदात्तता प्राप्त व्हावी, उच्च दर्जा प्राप्त व्हावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. या दृष्टिकोनाच्या पृष्टीसाठी मी काही उदाहरणे देऊ इच्छितो.

सर्वसाधारणपणे भारतीय लोकांना प्राचीन काळापासून मुलीचा जन्म ही एक अत्यंत दु:खद बाब वाटते. बुद्ध या भावनेशी सहमत होते काय ? त्यांचा या प्रश्नाच्याप्रती असलेला दृष्टिकोन, हा परंपरागत दृष्टिकोनाच्या अगदी विरुद्ध होता, हे राजा प्रसेनजीतला त्यांनी केलेल्या उपदेशावरून स्पष्ट होते. बुद्ध श्रावस्तीतील जेतवनात असताना एकदा राजा प्रसेनजीतने बुद्धाची भेट घेतली. राजप्रासादातून एक सेवक आला आणि त्याने कळविले की त्याची पत्नी राणी मल्लिका हिने एका कन्येला जन्म दिला. ही बातमी ऐकल्यावर राजाच्या चेहऱ्यावरील तेज मावळले, तो दु:खी आणि विषण्ण दिसायला लागला. त्याच्या चेहऱ्यात झालेला बदल बुद्धाच्या लक्षात आला आणि त्याला त्याचे कारण विचारले. त्याची माहिती मिळाल्यावर बुद्ध म्हणाले * “ दुःख का करावे ? हे राजपुरुषा, पुत्रापेक्षा कन्या अधिक चांगली अपत्य ठरु शकते. ती ज्ञानी आणि सद्गुणी होऊ शकेल. . . .. .. ज्या पुत्राला ती जन्म देईल त्याच्या हातून महान कार्ये घडू शकतील, तो मोठमोठ्या राज्यांवर अधिसत्ता गाजवू शकेल. . . . . . कं

काही कुटुंबे उत्कर्षाला पोहचतात आणि इतर नाश पावतात या प्रश्नांच्या उत्तरात बुद्धाने भिक्खूंना सांगितल्याचे नमूद आहे की २--

““ भिक्खूँनो, जी काही कुटुंबे मालमत्तेने मोठेपण मिळवितात ती, ते मोठेपण दीर्घकाल टिकवू शकत नाही कारण की, जे गमावले ते परत मिळविण्याचा प्रयत्न करित नाहीत, जे नुकसान झाले त्याची भरपाई करित नाहीत, जे अती खाणे आणि पिणे यात दंग असतात, जे अनैतिक पुरुष आणि स्त्रिया यांच्यावर विसंबून राहतात,

1: Samyutto Nikaya, Vol. 1, P. 110.

2: Anguttara Nikaya. Vol. I, P. p. 254-255.

त्राय ६४१ 7 २८