डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३९८
या सर्वास वरील चार पैकी एक अथवा इतर ती कुटुंबे दीर्घकाल टिकत नाहीत.
कारणे कारणीभूत असतात.
सर्व परत भिक्खूंनो, जी काही कुटुंबे दीर्घकाळ टिकतात, ती गमावलेले मिळविण्याचा प्रयत्न करतात, नुकसान झाल्याची भरपाई करतात, ती खाणे-पिणे मर्यादित ठेवतात आणि सद्गुणी स्त्री व पुरुष यांच्याकडे जबाबदारी सोपवितात. अशी ada दीर्घकाळ टिकतात. या सर्व गोष्टींना या चार कारणांपैकी एक किंवा इतर कारणे कारणीभूत आहेत.
ज्यावेळी एखादा राजा सर्वागीण क्रांतिकारक परिवर्तनाचे कार्य करून जगात चक्रवर्ती (सम्राट) होण्याचा संकल्प करतो अशावेळी काय होते हे बुद्धाने भिक्खूंना
असे सांगितल्याचे नमूद आहे की-"
“on सम्राट जेंव्हा केंव्हा होतो त्यावेळी सात साम्पत्तिक (भांडारे)
लक्षणे अस्तित्वात येतात. ही साम्पत्तिक लक्षणे म्हणजे रथ, हत्ती, अश्व, रत्न, स्त्री, गृहपिता आणि वारस होत. "
दुसन्या एका प्रसंगी, जगाला स्त्रीची महानता विशद करताना बुद्धाने
सांगितले,
'' स्त्री ही सर्वोच्च उपयोगी असण्याचे कारण की (जसा भाष्यकर्ता सुचवितो) ती अपरिहार्य उपयोगाची आहे कारण तिच्यापासूनच बोधिसत्व आणि सम्राट
जन्म घेतात. ” | |
ज्यांच्या दृष्टीने मुलीचा जन्म दुःखद प्रसंग नसून तो आनंदाचा प्रसंग आहे तसेच जी कुटुंबे स्त्रियांवर अवलंबून राहतात अशा कुटुंबाचा नाश होण्यापासून बचाव होतो, सात सर्वोच्च मौल्यवान वस्तुंपैकी स्त्री एक आहे असे जे मि:संकोचपणे प्रतिपादन करतात, त्यांना स्त्रियांचा द्वेष करणारे आणि तुच्छ लेखणारे म्हणून समजावे काय ? स्त्रियांविषयी असलेल्या सर्वसामान्यांच्या भावना बुद्धाने समजून घेतल्या. स्त्रियांचा उपहास आणि अनादर करण्याकरिता हे सर्व योजिले होते असे कोणी तरी म्हणू शकेल काय ?
भिवखुणीना भिक्खूच्या अधिपत्याखाली [ठेवून ] [बुद्धाने ] [सामाजिक ] [चूक ] [केली ] [असे ] ज्यांना वाटते, ते बुद्धाने स्त्रियांना संन्यास [किंवा ] [परिव्रज्या ] [(भिक्खुणी) ] [घेण्यास ] परवानगी देण्याच्या क्रांतिकारक कार्याची दखल घेत नाहीत. ब्राह्मणी तत्त्वज्ञानानुसार स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याचा हकक आधीच [नाकारलेला ]
' Ibid. Vol. V, P. 83.
2 Samyutta Nikaya, [Vol. ] [l. ] [P. ] [62. ]