कॉग्रेस व सर्वपक्षीय परिषद - Page 45

2

काँग्रेस व सर्वपक्षीय परिषद

यंदाच्या काँग्रेसमध्येंही याच वसाहतिक स्वराज्य कीं संपूर्ण स्वातंत्र्य या प्रश्‍नावर धुमाळी माजली होती. सायमन कमिशनची घटना कांहीं राजकोय पुढाऱ्यांना अग्राह्य वाढून त्यांनीं हिंदुस्तानचे राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी

'सर्व पक्षीय परिषद' ^ बोलाविली होती ही गोष्ट सर्वांना माहितच आहे. या परिषदेनें स्वराज्याचा खर्डा तयार करण्यासाठीं पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. प्रस्तुत कमिटीनें तयार केलेली स्वराज्यघटना नेहरू कमिटीचा रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे. वसाहतिक स्वराज्य ब्रिटीश पार्लमेंटने हिंदुस्तानला ताबडतोब द्यावे अशी मागणी या रिपोर्टात केलेली आहे. या मागणीला बहुतेक राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा आहे. पण गतवर्षी मद्रास काँग्रेसमध्यें ज्यांनीं संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करून घेतला, त्यांनीं मात्र, संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय नेहरू रिपोर्टात ग्रथित करण्यांत यावें अशी खटपट बऱ्याच दिवसांपासून चालविली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू प्रभृती कांही चुकले तरी प्रामाणिक पणानें चुकणारे लोक या पक्षाचे धुरीण आहेत. पणया पक्षाला दुसरे कांहीं असे लोक मिळाले आहेत कीं त्यांचा राजकीय आयुष्यक्रम लोकांच्या दृष्टीनें अत्यंत अविश्वसनीय आहे. उदाहरणार्थ श्रीनिवास अय्यंगार. यांना निश्‍चित राजकीय मतें अशी कोणतींच नाहींत. येन केन प्रकारेण लोकांच्या पुढें नाचायला मिळाले .कीं त्यांच्या राजकारणाचे चीज झालें. एकाद्या ठिकाणीं त्यांना नाचायला मिळालें नाहीं कीं अंगण वाकडें ही त्यांची

ओरड ठरलेली आहे. हीच त्यांची वक्रनीति प्रस्तुत बाबतीतही दिसून येते.

संपूर्ण स्वातंत्र्यांच्या चळवळींत ते मनापासून पडले आहेत अशांतला भाग नाही. ती चळवळ त्यांना मोतीलाल नेहरूंचें पुढारीपण हाणून पाडण्याचे साधन वाटत आहे. पंडित नेहरूंच्या जागीं जर श्रीनिवास अय्यंगारांचे नांव विराजमान होईल तर संपूर्ण स्वातंत्र्य आपल्या हातीं आलें असें म्हणून ते स्वस्थ बसतील यांत

कांही शंका नाही.

संपूर्ण स्वातंत्र्यवादी पक्षाला मिळालेले इतर लोकही याच मनोवृत्तीचे आहेत. कांहीं दिवसांपूर्वी भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेसकमिटोच्या बैठकींत या

SNOOP SPSS वजयी

॥ मे १९२८ मध्ये ही परिषद बोलविली गेली होती,