हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 441

हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती ..... जबाबदार कोण? ३९९

होता. जेंव्हा भारतीय स्त्रियांनी सन्यास घेण्याचा प्रश्न उपस्थित झाला तेंव्हा

त्यांनी (ब्राह्मणांनी) दुसरी चूक केली. इतिहासानुसार जे ब्राह्मण वेद पूजा

करीत होते आणि ज्यांनी उपनिषदांना पूजनीय मानण्यास दीर्घकाळ नाकारले होते

त्यांच्या दृष्टीने ' संन्यास ' हा आदर्श नव्हता. संन्यास हा उपनिषदांचा आदर्श

होता आणि संन्यासाची परिणती म्हणजे उपनिषदातील ' आत्मा हेच ब्रह्म ' या

तत्त्वज्ञानाची अनुभूती करणे होय. सन्याशी जीवनाला ब्राह्मणांचा प्रखर विरोध

होता आणि सरतेशेवटी ते नमले व त्यांनी त्यास काही अटींवर मान्यता दिली.

त्यापैकी स्त्रियां (आणि शुद्र) हे संन्यासाला पात्र नाही अशी एक अट होती.

स्त्रियांच्या प्रति असलेली ब्राह्मणांची मानसिकता ही बुद्धाच्या अगदी विसंगत

होती, यासाठी ब्राह्मणांनी स्त्रियांना सन्यास घेण्यापासून प्रतिबंध का केला हे

महत्त्वाचे कारण समजून घेणे उपयुक्त ठरेल. मनूने याचे कारण दिले

आहे. ते असे :-- |

९.१८. स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांचे

संस्कार वेदमंत्राविना करावे. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसते

कारण त्यांना वेद शिकण्याचा' अधिकार नाही. वेदमंत्राचे

उच्चारण पाप क्षालन करण्याकरिता उपयोगी आहेत. ज्याअर्थी

स्त्रियां वेदमंत्र उच्चारु शकत नाही त्याअर्थी त्या असत्य (पापमय)

आहेत.

मनु बुद्धाच्या नंतर झालेला असला तरीही जुन्या धर्मशास्त्रामध्ये अभिव्यक्त

केलेला दृष्टिकोन त्याने प्रतिपादित केला. स्त्रियांबद्दलचा हा दृष्टिकोन भारतीय

स्त्रियांचा अपमान आणि त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. विद्यार्जन करणे हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय स्त्रियांना नाकारण्यात आला. हा स्त्रियांवर केलेला अन्याय आहे. स्त्रियांना विद्यार्जन करण्याची आधी संधी नाकारणे आणि नंतर तिला ज्ञान नसल्यामुळे . ती अशुद्ध आणि असत्य (पापमय) असल्याचे जाहीर करणे आणि म्हणून तिला संन्यास, जे ब्रह्माजवळ जाण्याचे माध्यम होते त्याची परवानगी न देणे हा तिचा अपमान होय. ब्राह्मणांनी स्त्रियांना त्यांच्यातील आध्यात्मिक शक्तीची अनुभूति घेण्याचा हक्कच केवळ नाकारला नाही तर तिच्यात आध्यात्मिक शक्तीचा पूर्णपणे अभाव आहे असे जाहीर केले.