हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 442

४०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्त्रियांशी केलेला हा क्रूर व्यवहार होय. इतिहासात याला तोड नाही प्रो. मॅक्समुल्लर * यांनी सांगितल्याप्रमाणे “ दैवीशक्तीपासून मानव कितीही दूर असला तरी या पृथ्वीवर ईश्वरासम पुरुषाशिवाय कोणीही नाही, या पृथ्वीवर पुरुषाशिवाय ईश्वर सदृश्य कोणीही नाही. “ हे पुरुषाच्या बाबतीत खरे आहे तर स्त्रीच्या बाबतीत हे खरे का नाही ? ब्राह्मणांजवळ याचे उत्तर नाही

स्त्रियांना परिव्राजिकेच्या जीवनात प्रवेश करण्याची मुभा देऊन बुद्धाने एकाच प्रहारात हे दोन्ही अन्याय नाहीसे केले. त्यांनी त्यांना ज्ञानार्जनाचा हक्क देऊन पुरुषांच्या बरोबरीने आध्यात्मिक शक्तीची अनुभूती घेण्याचा- हक्क प्रदान केला. ही, भारतीय स्त्रियांच्या दृष्टीने क्रांती तसेच त्यांची मुक्ती दोन्हीही होते. प्रो. मॅक्समुल्लरच्या २ शब्दात :--

भारतीय इतिहास आपल्याला असे शिकवितो की जुन्या ब्राह्मणी गुलामी नियमांच्या जालीम शृंखला सरतेशेवटी तोडल्या गेल्या. बौद्ध तत्त्वज्ञानाने, वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क, मुख्यत्वेकरुन सामाजिक विषमतेच्या पाशातून मुक्त होण्याचा हकक जसे की, इच्छेप्रमाणे रानात जाऊन संपूर्ण स्वतंत्र आध्यात्मिक जीवन जगण्याचा हक्क प्रस्थापित केला, हे मान्य करण्यास तिळमात्र शंका

नाही. “

भिक्खुणी संघाला भिक्खू संघाच्या अधिपत्याखाली ठेवल्याच्या लांच्छनाच्या तुलनेत बुद्धाने भारतीय स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य हे कितीतरी महत्त्वाचे आणि श्रेष्ठ आहे. हे पोकळ स्वातंत्र्य नव्हते. या स्वातंत्र्याचे त्यांनी मनापासून स्वागत आणि गुणगाण केले. " खरोखरच स्वतंत्र आहे ! मी असीमित स्वतंत्र आहे “ असे गुणगान भिक्खुणी मुत्ता, * जी ब्राह्मण कन्या होतीं, तिने केले. तसेच गुणगान दुसरी ब्राह्मण कन्या, भिक्खुणी After हिनेही केले. "मी येथे या पाषाणावर बसून मनसोक्त स्वातंत्र्याचा श्वासोच्छास घेत

आहे, “२

मिसेस Pea डेकिड्सच्यानुसार *

त्यांनी (स्त्रियांनी) या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याकरिता, नंतर झालेल्या खिश्चेन भगिनीसारखे, आपली सर्व सामाजिक प्रतिष्ठा, सर्व ऐहिक वैभव आणि पूर्वीच्या जीवनाचा सर्वस्वी त्याग केला. परंतु याच्या बदल्यात, अनुबंधित जीवनाचे कितीही उदात्तीकरण झालेले असेल, कितीही उत्तेजन दिलेले असेल

  1. Hibbert Lectures on Religion. P. 379.

२: Ibid, P. 373.

3: Psalms of the Sisters, No. XI.

*: Ibid No. XXIV.

5: Preface to Therigatha.