आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन Yor
XXXVI बुद्धानंतर संघाचा उत्तराधिकारी शकली. Psalms मधील घटनेप्रमाणे,
' हिने आध्यात्मिक पात्रता प्राप्त केली असणाऱ्या कश्यपाच्या बरोबर ' भद्दा
सर्व अविवाहित, परित्यक्ता तसेच वारांगणा या होती. त्यांनी विवाहित,
वर्गातील स्त्रियांकरिता त्यांचा मार्ग खुला ठेवला होता. त्या सर्व, पुरुषांबरोबरीची योग्यता, स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि समता प्राप्त करू शकल्या.
४..
एकेकाळी भारतीय स्त्रियांच्या असलेल्या दर्जाचे कमालीचे अधःपतन झाले यात मुळीच शंका नाही. प्राचीन काळी राजकीय घडामोडीत त्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल खूप काही सांगता येत नाही. परंतु त्यांनी देशाच्या बौद्धिक आणि सामाजिक जडणघडणीत अत्युच्च स्थान प्राप्त केले होते यात
मुळीच शंका नाही
अथर्व वेदानुसार हे स्पष्ट आहे की ऐकेकाळी स्त्री ' उपनयन ' या विधीला पात्र होती, जेणेकरून मुलीचे ब्रह्मचर्य संपल्यानंतर ती विवाहयोग्य होत असे असे बोलल्या जात होते. श्रौत सुत्रानुसार हे स्पष्ट आहे की स्त्रियां वेदमंत्रोच्चार करू शकत होत्या आणि त्यांना वेद शिकविले जात होते. स्त्रियां गुरूकुलात (विद्यापीठात) जाऊन वेदांच्या विविध शाखांचा अभ्यास करून त्यांची मीमांसा करण्यात निष्णात होत्या. पाणिनीचा ' अष्टाध्याय ' हा या गोष्टीचा पुरावा. आहे. स्त्रियां ह्या शिक्षिका होत्या आणि त्यांनी विद्यार्थिनींना
वेद शिकविले हे पतंजलीच्या महाभाष्यावरून दृष्टीस येते. स्त्रियां पुरुषांशी धर्म, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र इत्यादी गहनं विषयावर चर्चा करीत होत्या अशा गोष्टींची वाण नाही. मनूपूर्व काळात भारतीय स्त्रियांनी ज्ञान आणि विद्वतेच्या जोरावर अत्युच्च शिखर गाठले होते हे जनक आणि सुलभा याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्रयी तसेच शंकराचार्य आणि विद्याधरी यांच्यात झालेल्या जाहीर वादविवादाच्या गोष्टींवरून दिसून येते
एकेकाळी स्त्रियांचा मोठा आदर केला जात असे यात दुमत नाही. प्राचीन
भारतात राजाच्या राज्यभिषेक प्रसंगी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रत्नींमध्ये
राणीचाही समावेश असे आणि इतरांप्रमाणेच तो राणीलाही नजराणा देत असे.'
निवडलेल्या ह्या राजाने केवळ राणीचाच सन्मान केला नव्हता तर त्याने कनिष्ठ जातीतील ? इतर पत्नींचा सुद्धा सन्मान केला होता. तसेच राज्याभिषेकांच्या
समारोहानंतर राजा प्रतिष्ठित स्त्रियांना वंदन करीत असे: *
oe ': Jaiswal Indian Polity Part-l! SE 16. |
2: Ibid P. 17.
3: {bid P. 82.