हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती . . . : . जबाबदारे कोण ? ४०३
स्त्रियांचा हा जगातील अत्युच्य दर्जा होय. तर मग त्यांच्या अवर्नतीकरिता कोण जबाबदार आहे ? तो हिंदुंचे कायदे करणारा ' मनू ' होता. .याशिवाय़ दुसरे कुठलेही उत्तर नाही. याबाबत शंकेला कुठलाही वाव राहू न देण्याच्या दृष्टीने मनूने स्त्रियांकरिता तयार केलेले काही कायदे जे मनुस्मृतीत आढळतात, ते मी उद्धृत करतो
पुरूषांना आकर्षित करून भ्रष्ट करणे, हे स्त्रियांचे वैशिष्ट्य
होय. ह्या कारणामुळे ज्ञानी लोक स्त्रियांच्या सान्निध्यात कधीच
बेसावध नसतात.
२.२१४. स्त्रियां केवळ मुर्खानाच वाम मार्गाने नेतात असे नसून त्या ज्ञानी
पुरुषांनासुद्धा काम आणि क्रोध यांचे गुलाम बनवितात.
२.२१५. वासना ह्या प्रबळ असल्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाला सुद्धा गुलाम
बनवितात म्हणून कुणीही आपल्या माता, भगिनी किंवा कन्या
यांच्या सोबत एकांतात राहू नये.
९.१४. स्त्रियां पुरूषांच्या सौंदर्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्या
वयाकडे बघत नाहीत. ' हा पुरूष आहे.' एवढेच मनात आणून
स्त्रयां त्या पुरुषाच्या स्वाधीन होतात. मग तो सुंदर असो अथवा
कुरूप असो.
९.१५. स्त्रियांना कितीही ताब्यात .ठेवले तरीही, -त्यांना पुरूषांबद्दल
असलेल्या त्यांच्या वासनेमुळे, त्यांच्या चंचल. स्वभावामुळे, तसेच
त्यांच्यात निसर्गतः असलेल्या निर्दयीपणामुळे त्या त्यांच्या पतीचा
ही विश्वासघात करतात.
९.१६ निर्मात्या ईश्वराने स्त्री निर्मितीच्यावेळी त्यांची रचनाच अशी केली
की त्यांना ताब्यात ठेवण्याकरिता : प्रत्येक पुरूषाने पराकाष्ठेचे '
प्रयत्न करावयास पाहिजे.
९,१७ मनूने स्त्रियांना कामवासनेची तीव्र इच्छा, शृंगार, अपवित्र
वासना, क्रोध, अप्रामाणिकपणा, मत्सर आणि दुर्वर्तन बहाल
केले.
मनूच्या दृष्टीने स्त्री किती .नीच होती हे यावरून दिसते.
मनूचे स्त्रियांविरुद्ध असलेले कायदे हे त्याच्य़ा ह्या दृष्टीकोनाचा पुरावा
होय.