भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि ४०४
स्त्रियां स्वतंत्र असू नयेत. कुठल्याही परिस्थितीत
मनूच्या मतानुसार :--
आपल्या कुटुंबातील स्त्रियांना रात्रंदिवस आपल्यावर ९.२. पुरूषांनी
अवलंबून ठेवावे. त्यांची वैषयिक अभिरूची निर्माण होत असेल
तर त्यांना ताब्यात ठेवावे.
तरूणपणात आणि म्हातारपणात ९.३. स्त्री तिच्या लहानपणात पिता, पती
पुत्र यांच्या नियंत्रणात असते. ती कधीही स्वतंत्र राहू शकत
नाही.
९.५. स्त्रीला विशेषकरून पापमय प्रवृत्तीपासून परावृत्त केलेच पाहिजे.
जर. तिला त्यापासून परावृत्त केले नाही तर क्षुल्लक बाब
सुद्धा दोन्ही कुटुंबावर दुःख ओढविते.
९.६. सर्व जातींचे सर्वांत महत्वाचे कर्तव्य म्हणजे कमकुवत पतींनी
सुद्धा आपल्या पत्नीच्या सुरक्षिततेची पराकाष्ठा करावी.
५.१४७. मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध स्त्रीने स्वतःच्या घरी
सुद्धा काहीही स्वतंत्रपणे करू नये.
५.१४८. स्त्रीला तिच्या बालपणी तिच्या पित्यावर, तरूणपणी तिच्या
पतीवर आणि तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या पुत्रांवर अवलंबून
राहायला हवे. ती कधीही स्वतंत्र राहू शकत नाही.
५.१४९. तिने पिता, पती, किंवा पुत्र यांच्यापासून विभक्त होण्याचा प्रयत्न
करू नये. त्यांच्यापासून विभक्त झाल्यामुळे ती दोन्हीकडील
(स्वतःच्या आणि तिच्या पतीच्या) कुटुंबाला तिरस्करणीय
ठरते.
स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही.
९.४५. पतीचे पत्नीसोबत असणे बंधनकारक आहे. , म्हणजेच, एकदा
विवाह झाल्यानंतर पत्नी वेगळी होऊ शकत नाही.
मनूने संस्कारित विवाहालाच सन्मानाचे स्थान दिले आणि म्हणून घटस्फोटाला परवानगी दिली नाही. मनूचा घटस्फोटासंबंधी असलेला हा कायदा, हाच सर्व काही आहे असे बहुतांश हिंदू समजतात आणि येथेच थांबतात. ते त्यांच्या विवेकाचे ह्या विचाराने समाधान करतात तसेच त्याला ईश्वरी मानतात. अर्थांत, हे सत्यापासून कितीतरी दूर आहे. मनूच्या