हिंदु रित्रयांची उन्नति आणि अवनती . . . . . जबाबदार कोण? ४०५
घटस्फोटाविरूद्ध असलेल्या कायद्याचा उद्देश अगदी वेगळा होता. येथे पुरूषाला स्त्रीच्या बंधनात ठेवावयाचे नसून स्त्रीला पुरूषाच्या बंधनात ठेवण्याची आणि पुरूषाला मात्र स्वतंत्र सोडण्याची प्रक्रिया होती.--
पुरुषाने पत्नीला सोडून देण्यावर मनूने कुठलेही बंधन घातले नाही. खरे म्हणजे त्याने (मनूने) पत्नीचा पूर्णपणे त्याग करण्याची पुरूषाला मुभा दिली, इतकेच नव्हे तर तो तिला विकण्याची सुद्धा परवानगी देतो, परंतु तो पत्नीला स्वतंत्र होण्यापासून पूर्णपणे प्रतिबंधीत करतो. मनू काय म्हणतो ते पहा :--
९.४६. पत्नीला विकल्यानंतर किंवा तिचा अस्विकार केल्यानंतर सुद्धा ती
पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही.
याचा अर्थ असा की पत्नीला पतीने विकले किंवा तिचा अस्विकार केला तरीही ती दुसऱ्याची, (ज्याने तिला विकत घेतले किंवा आश्रय दिला, त्याची) कायदेशीर पत्नी कधीच होऊ शकत नाही. याच्या इतके क्रूर, दुसरे काहीही असू शकत नाही. परंतु मनू कायदे करीत असताना न्याय आणि अन्याय याची जाणीव ठेवण्याची चिंता करीत नव्हता. मनूला, स्त्रियांना बौद्ध काळात मिळालेल्या स्वातंत्र्यापासून वंचित करावयाचे होते. तिला मिळालेल्या हक्कामुळे मनू दुखावला होता आणि म्हणून त्याने त्यावर पूर्णपणे बंदी घालून मिळालेल्या स्वातंत्र्यापासून तिला वंचित केले.
संपत्तीच्या बाबतीत मनूने पत्मीला गुलामाच्या स्तरावर आणले.
९.४१६. पत्नी, पुत्र आणि गुलाम या तिघांनाही कुठलीही संपत्ती संपादन
करण्याचा हक्क नाही. त्यांनी मिळविलेली संपत्ती ही ते ज्याच्या
मालकीचे आहेत त्याची असते.
पती जर संयुक्त कुटुंबातील असेल तर मनू पत्नी विधवा झाल्यावर तिच्या प्रतिपाळाची परवानगी देतो आणि जर पती कुटुंबापासून विभक्त असेल तर त्याच्या मालमत्तेत तिला गृहीत धरतो. परंतू संपत्तीवरील तिच्या वर्चस्वाला मनू कधीही मान्यता देत नाही.
मनूच्या कायद्याप्रमाणे स्त्री देहदंडास पात्र आहे. तंसेच मनू पत्नीला मारण्याचा अधिकार पतीला देतो. | |
८.२९९. पत्नी, पुत्र, गुलाम, विद्यार्थी आणि सख्खा धाकटा बंधु, यांनी
जर काही चूक केली असेल तर त्यांना दोरखंड किंवा
फोडलेल्या बांबूने मारता येते.