४०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मनूनुसार स्त्रीला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नाही.
मनूने वेद शिकण्याच्या तिच्या अधिकारावर पूर्णपणे बंदी आणली.
२.६६. रित्रयांकरिता सुद्धा संस्कार करुन घेणे आवश्यक आहे आणि ते
करावे. परंतु ते वेदमंत्राविना करावे.
ब्राह्मणी तत्त्वज्ञानाप्रमाणे यज्ञ करणे हा धर्माचा मूळ आत्मा होय. मनू स्त्रियांना यज्ञ करण्यापासून प्रतिबंधीत करतो. तो असा कायदा करतो की :--
९.३६-३७. वेदांनी निर्धारित केल्याप्रमाणे स्त्रियांनी दैनंदिन यज्ञयागादी
करु नयेत. तिने तसे केल्यास ती पापयोनीत जाते.
स्त्रीला अशाप्रकारचे यज्ञयागादी करता येऊ नये म्हणून मनूने तिला ब्राह्मणांची मदत आणि त्यांचा उपयोग घेण्यास प्रतिबंधीत केले.
` ४.३०५-२०६. स्त्रीने यज्ञ केल्यानंतर तिने दिलेले अन्न ब्राह्मणांनी ग्रहण
करु नये. स्त्रियांनी केलेले यज्ञ हे अमंगल असून ते
देवाला मान्य नाही म्हणून ते टाळावे. शेवटी मनूने स्त्री
पुढे जीवनाचा आदर्श जसा मांडला तो त्याच्याच शब्दात
सांगणे योग्य आहे :--
५.१५१. पित्याने अथवा पित्याच्या संमतीने तिच्या बंधूने तिला ज्या
| o पुरुषाला दान केले असेल, तिने तो जिवंत असेपर्यंत त्याच्या
आज्ञेत राहावे आणि त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्मृतीचा सुद्धा
अपमान करु नये. |
५.१५४. प्रामाणिक पत्नीने तिचा पती कितीही दुर्गुणी, व्यभिचारी किंवा |
सद्गुणविरहित असला तरीही त्याची ईश्वर समजून सतत पूजा
. करावी.
५.१५५. _ स्त्रियांनी आपल्या पतीशिवाय यज्ञ, नवस, उपवास करु
नये. ती पतीच्या आज्ञेत राहिली, केवळ ह्या
कारणामुळे ती स्वर्ग लोकांमध्ये गौरवास पात्र ठरते.
यानंतर मनूने स्त्रियांकरिता निर्धारित केलेले मूलभूत निवडक कायदे देत आहे :-- |
५.१५३. जो पुरुष तिच्याशी पवित्र मंत्रोच्चाराने विवाहबद्ध झाला तो
तिच्याकरिता अनुकूल तसेच प्रतिकूल काळात, या जन्मी तसेच
पुढच्या जन्मी सतत सुखाचा जनक ठरतो.