हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती ..... जबाबदार कोण? ४०७
५.१५०. तिने नेहमी आनंदी राहावे; घरगुती कामकाजात आणि
व्यवस्थापनात कुशल असावे, काळजीपूर्वक भांडी स्वच्छ करावी
आणि खर्चात काटकसरी असावे.
हिंदू याला स्त्रियांकरिता असलेला उदात्त असा आदर्श मानतात | | |
' स्त्री-हत्या ' हे केवळ उपपातक म्हणजेच क्षुल्लक गुन्हा आहे, असा मनूने नवीन नियम करून त्याने स्त्रियांच्या निर्बलींकरणाच्या इमारतीवर कळस चढविला.
११.६७. स्त्रियां, शुद्र, वैश्य, क्षत्रिय आणि निरिश्वरवादी इत्यादिंचा शिरच्छेद तसेच मद्यपान हे सर्व क्षुल्लक गुन्हे होत. |
शुद्र, वैश्य आणि क्षत्रिय यांची हत्या, हे केवळ उपपातक होते असे मनूने का म्हटले हे कोणीही सहज समजू शकतो. ब्राह्मण या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे आणि केवळ ब्राह्मणाचीच हत्त्या हे महापातक होते हे प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न होता. परंतु त्याने तसाच नियम स्त्रियांकरिता का वापरला ? याचे एकमेव कारण असे की मनूच्या दृष्टीने ' स्त्री ' ही कुठलीही किंमत नसलेली वस्तू होती.
वरील उद्धारणांच्या वैशिष्ट्यावरून मनू हा भारतीय स्त्रियांच्या अवनतीसे कारणीभूत होता याबद्दल कोणीतरी शंका घेऊ शकेल काय ? बऱ्याच लोकांनो ह्या बाबींची बहुतेक जाणीव आहे. परंतु त्यांना दोन बाबी माहीत नसल्याचे जाणवते. त्यांना यामध्ये विशेष असे काय आहे, हे माहीत नाही. मनूच्या स्त्रियांविषयी कायद्यांमध्ये नवीन अथवा आश्चर्यकारक असे काहीही नाही. भारतात ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा जेव्हापासून उदय झाला तेव्हापासून ब्राह्मणांचा असाच दृष्टिकोन आहे. मनूच्या आधी ते केवळ सामाजिक सिद्धांत होते. ह्या सामाजिक सिद्धांताला राज्याच्या कायद्यामध्ये रुपांतरितं करण्याचे काम मनूने केले. . मनूने स्त्रियांवर हे निर्बलीकरणाचे कायदे का लादले हे त्यांना माहीत नसणे, ही दुसरी बाब आहे. आर्य समाजात शुद्र आणि स्त्रियां हे महत्त्वाचे दोन घटक होते. - ब्राह्मणी धर्माच्या मूलगामी तत्त्वांना सुरूंग लावून ते समुहा-समूहाने बुद्धांच्या धम्मात प्रवेश करण्याकरिता जात होते. बौद्ध धम्माकडे जाणाऱ्या स्त्रियांच्या ह्या लाटेला मनूला थोपवावयाचे होते.
` मनूने ह्याकरिता स्त्रियांवर निर्बलीकरणाचे कायदे लादून त्यांना कायमचे पंगू केले. ह्याबद्दल ज्यांना शंका आहे त्यांनी मनूस्मृतीमधील खालील आदेशाचा विचार 'करावा :--
५.८८. मिश्र विवाहापासून, संन्याश्यापासून तसेच आत्महत्त्या केलेल्या
व्यक्तीपासून जन्मलेल्यांचे, ' मृत्यू आणि त्यानंतरचे संस्कार '