४०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सामान्य व्यक्तिच्या मृत्यू आणि अंत्यसंस्काराप्रमाणे
करण्यास मनाई केली आहे.
५.८९. ज्या स्त्रियांनी निरिश्वरवादी संप्रदायात (Heretic Sect) प्रवेश
घेतला, ज्या स्वच्छंदी वागतात, गर्भात असणाऱ्या अर्भकाला तसेच
स्वतःच्या पतीला ज्या इजा पोहचवितात तसेच ज्या मद्यपान
. करतात अशांनीही वरील संस्कार नाकारले.
हे आदेश इतर उद्देशाशिवाय जे (१) संन्याशी वृत्तीचे आहेत आणि (२) ज्या स्त्रियांनी निरिश्वरवादी संप्रदायात प्रवेश घेतला अशांना दृष्टीत ठेवून जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत. या आदेशामघील संन्याशी हे परिव्राजकाला, स्हणजेच ज्यांनी आपले घरदार पूर्णपणे सोडून संन्यास घेतला आहे अशांना संबोधून आहे. मनूने निरिश्वरवादी सम्प्रदायाचा उल्लेख करताना त्याच्या मनात बौद्ध धर्म होता यात कुठलीही शंका नाही. यावरून हे स्पष्ट आहे की संन्याशी किंवा ज्या स्त्रीने निरिश्वरवादी सम्प्रदायात प्रवेश घेतला असेल त्यांचे कुठलेही अंत्य व उत्तर संस्कार करण्यात येणार नाहीत इतकेच नव्हे तर त्यःच्या कुटुंबातील सदस्यांकरिता, तो पुरुष अथवा स्त्री, तसेच ज्याने बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे अशांचेही अंत्य आणि उत्तर संस्कार करण्याची मनाई केलेली आहे. दुसऱ्या शब्दात, त्यांचा जणू त्या कुटुंबाशी संबंधच नसून आणि ते त्या कुटुंबाचे घटकच नाहीत अशी मनूला त्यांच्याशी वागणूक ठेवावयाची होती. मनू हा बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक होता. स्त्रियांवर लादलेल्या अनेक अन्यायांचे हे मर्म आहे. त्याला हे माहीत होते की जर आपले घर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवावयाचे असेल तर ती केवळ स्त्री आहे जिला बंधनात ठेवणे अत्यावश्यक आहे
आणि ते त्याने केले. भारतीय स्त्रियांच्या अवनतीला आणि -हासाला कारणीभूत
दोष बुद्धावर नसून तो संपूर्ण मनूवर येतो.
या काही पृष्ठात मी हिंदू स्त्रियांचे उत्थान आणि पतन याची हकीगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अवनतीचा जनक कोण आहे आणि त्याने हे सर्व का केले, याचे सुद्धा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वग्रहदूषित नसलेले तसेच नि:पक्ष लोक जाणतील की या सर्व शोकात्तिकेला बुद्धाला जबाबदार धरता येणार नाही, अशी मी अपेक्षा करतो. बुद्ध झटले, ते स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा दर्जा पुरूषांच्या बरोबरीने आणण्यासाठीच ! |
अनुवादक : संपादक मंडळ, डॉ. कृष्णा. एम. कांबळे व प्रा. आनंद आर. गजवे.