हिंदु समाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीच भेद व लिगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारण्याचे कायदे म्हणजे घाणं न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले ! - Page 452

४१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मंत्रीमंडळ आपलें कार्य कसें करीत असतें, सर्व मंत्र्यांचे प्रत्येक मुद्यावर एक मल होते कीं त्यांच्यात धुसफुस होत असतें याबद्दलची माहिती लोकसभेला कधींच मिळत नाहीं. मंत्र्यामंत्र्यांत मतभेद झाले तरी ज्या मंत्र्याला मंत्रीमंडळांतील बहुमतांचा पाठिंबा मिळत नाहीं अशा मंत्र्याने आपले मतभेद मंत्रीमंडळाबाहेर प्रगट करू नयेत आणि मंत्रीमंडळाच्या संयुक्त जबाबदारीला प्रत्येक मंत्र्याने मान झुकविली पाहिजे, या तत्वाची घोरपड संदर मंत्र्याच्या गळ्यात अडकलेली असल्यामुळें त्याला आपले मतभेद -बाहेर प्रगट करतां येत नाहीत व म्हणून लोकसभेला मंत्रीमंडळाच्या कार्य करण्याच्या पद्धतीची कांही माहिती मिळत नसतें. म्हणून मंत्रिमंडळात मतभेदांचा अग्नि धुमसत असला तरी लोकसभेला वाटतें कीं मंत्रीमंडळाचे सुताच्या धाग्याप्रमाणें सुरळीत चाललेलें आहे. ज्या मंत्र्याला राजिनामा देऊन मंत्रीमंडळ सोडावयाचें आहे त्यानें आपण असें कां करतो याची सविस्तर माहिती लोकसभेला देणें हें त्याचें कर्तव्यकर्म होय.

याशिवाय दुसरें कारण असें कीं, जो मंत्री आपल्या राजीनाम्याची सत्य बाजू लोंकांपुढें न मांडता निघून जाईल त्याबद्दल लोकांचा असा समज होईल कीं, या मंत्र्याचें घोडें कोठें तरी पाणी पित असलें पाहिजें, मग तें त्याच्या खाजगी बाबतींत असो वां सार्वजनिक बाबतींत असो. राजिनामा देणाऱ्या कोणत्याहि मंत्र्यानें लोकांना तर्क कुतर्क करण्यांस वाव देऊं नये यांतून उत्तम मार्ग म्हणजें लोकांपुढे आपल्या कृतिचें निवेदन मांडणें हा होय

तिसरें कारण असें कीं, आपली जीं वर्तमानपत्रे आहेत त्यांत अशी कित्येक आहेत कीं, ती कांही सार्वजनिक कार्यकर्त्याबद्दल नेहमीच पूर्वग्रहदुषित दृष्टीनें लिहीत असतात, तर कित्येक नुसत्या टीकेचा भडीमार उठवित असतात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या गुणावगुणांवर योग्य तेवढा प्रकाश टाकणें हें अशा वृत्तपत्रांना नंतर कधींहि जमत नाहीं. राजिनाम्याच्या प्रकरणांत या वृत्तपत्रांना जेवढी म्हणून कांही न्यूनस्थळें दिसतील तेवढीच तीं लोकांपुढे मांडतील आणि राजीनाम्याची खरी कारणें पुढें न मांडता सदर वृत्तपत्रे स्वकपोलकल्पित कारणें पुढें घुसडून देतील. वृत्तपत्रांना ही उलटापालट करण्याची एवढी काँ उठाठेव करावी लागते ? कारण, त्यांना जे मंत्री प्रिय वाटतात त्यांचा त्यांना उदोउदो करून लोकांत त्यांचें स्तोम माजवावयाचे असतें, आणि जे मंत्री त्यांना अप्रिय वाटतात त्यांची अतीरंजीत वर्णने अशी करावयाची कीं, ते मंत्री लोकांच्या डोळ्यात

खुपत राहावेत !

मंत्रिमंडळातून बाहेर पडावयाच्या अगोदर मला जे निवेदन या लोकसभेंपुढें मांडावयाचे आहे, त्याची कारणें हीं अशीं आहेत.