हिंदु समाजातील वर्गावर्भातील ..... पस्यांचे बंगले ? ४११
मी कायदेमंत्री व्हावे म्हणून मला प्रधान मंत्र्यांने सुचविले त्याला आज ४ वर्षे १ महिना व २६ दिवस झाले. मंत्रीपदाची सूचना माझ्या पुढें मांडण्यात. आली तेव्हां मला मोठे आश्चर्य वाटले. मी विरोधी पक्षांतील माणूस, त्यांतून ऑगस्ट १९४६ मध्यें जें हंगामी सरकार आले त्यांत बसण्यांत सर्वस्वी नालायक म्हणून माझ्याबद्दल चोहोकडे डंका पिटविलेला होता. अशा परिस्थितींत माझे सार्वजनिक आयुष्य जात असतांना मला. मंत्रिमंडळात या म्हणून प्रधानमंत्री मला आंमत्रण देतात हें पाहून मला आश्चर्य तर वाटलेच पण असें करण्यास प्रधानमंत्री कोणत्या कारणामुळें उद्युक्त झाले, याबद्दल तर्कवितर्क करण्यास मला विषय मिळाला. प्रधान मंत्र्यांच्या मंनांत एवढा थारेपालट झाला तो कशामुळे ? या घटनेबद्दल मी साशंक झालो. जे माझ्योशीं कधी मित्रभावानें वागलें नाहीत अशा मंत्र्यांच्या बरोबर माझे कसें काय जमेल, हें मला कळलें नाहीं. शिवाय मला अशी शंका वाटते होती कीं माझ्या पूर्वी जे गृहस्थ कायदे मंत्री झालेले होते त्याचे जे अवाढव्य ज्ञान होते आणि कायदे खात्यांतील कार्याचा जो एक उच्च दर्जा उत्पन्न करून ठेवलेला होता त्यापुढें माझें कसें काय होईल ! परंतु या माझ्या सर्व शंका आणि माझे हे सर्व तर्कवितर्क मी माझ्या जवळच ठेऊन दिले आणि कायदे मंत्रीपदाची चालून आलेली जागा मी स्वीकारली. ही जागा स्वीकारण्यात माझा प्रमुख हेतु हा होता कीं, राष्ट्रविकासासंबंधीच्या कार्यात जर हे लोक माझ्य़ाशीं सहकार्याचा हात पुढें करीत आहेत तर तो हात न धरणें हे योग्य नव्हे. मंत्रिमंडळाचा सभासद आणि कायदेमंत्री या द्विविध स्वरूपांत मी आपलें कर्तव्यकर्म कितपत चोख रीतीनें बजावलें, हें माझ्या हाती नाहीं, ते जनतेच्या हाती आहे. जनता तें ठरविलच
माझ्या सहकार्यापासून तुटून दुर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या याबद्दल मी आतां माहीती सांगतो. मंत्रीमंडळातून आपण बाहेर पडावें; अशी मला फार दिवसापासून तळमळ लागून राहिलेली होती. आणि. अशी तळमळ लागायला एकामागून एक अशी अनेक प्रकारची कारणें एक सारखी उत्पन्न होत गेली. हि | 6...
प्रथम मी वैयक्तिक कारणांकडे-वळतो. हौं वैयक्तिक माझ्या राजिनाम्याला सर्वथा कारणीभूत झाली नाहींत हें मात्र मी आगाऊ सांगतो. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचा मी पूर्वी सभासद होतो त्यामुळे मला माहित. आहे कीं, कायदेमंत्रीपद हें अंमलबजावणीच्या दृष्टिने महत्वाचे पद नाही, भारत सरकारची धोरणें ठरवण्याच्या बाबतींत कायदे खात्याला कधींच संधी मिळाली नाही, व. मिळत नसतें. हैं खाते म्हणजे एकाद्या बुढ्ढ्या वकीलाला