हिंदु समाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीच भेद व लिगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारण्याचे कायदे म्हणजे घाणं न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले ! - Page 454

४१२ डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मनकरमणुकीसाठीं दिलेलें पोकळ खेळणें होय, असें आम्ही कायदेखात्याबद्दल मत प्रदर्शित करीत असून प्रधान मंत्र्यांनी जेव्हा मंत्रीपदाची देणगी माझ्यापुढे ठेवली तेव्हां त्यांना मी म्हटलें कीं. मी धंद्याने वकील आहें हें खरें, प्रण मी जे उच्च प्रतिचे शिक्षण घेतलेलें आहे. आणि कामाकाजांचा जो मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे त्यावरुन मी दोन खाती चालविण्यास समर्थ आहे आणि व्हाईसरॉयच्या कारकीर्दीत मी अंमलबजावणीचा संबंध असलेलीं दोन खाती चालवित होतों--एक मजूर खातें व दुसरें सेंट्रल पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट. तेव्हां तुम्ही मला कायदेखाते देतां त्याच्या जोडीला दुसरे अंमलबजावणीचा संबंध असलेले खाते मला द्या. माझ्या या मागणीला प्रधान मंत्र्यांनी मान्यता दिली व ते म्हणाले कीं, [प्लॅनिंग] योजना खातें लौकरच निर्माण करण्यात येईल. व तें तुमच्याकडे सोंपविलें 'जाईल. दुर्दैवाने हें खातें फार उशीरा निर्माण करण्यात आलें आणि ते जेव्हां निर्माण करण्यांत आलें तेव्हां मला डावलून ते दुसऱ्याच्या हाती दिलें गेलें. मंत्री म्हणून मी जेवढा काळ घालविला तेवढ्या काळांत एका मंत््यापासून दुसऱ्या मंत्र्यांकडे अनेक खात्याची फिरवाफिरवी करण्यांत आली. या फिरवांफिरवी जेव्हां चालूं होत तेव्हां मला वाटे की. एकादें जादा खाते मला देण्यांत येईल. परंतु मला शेवटी दिसून आले कीं, या भानगडीतून मला वगळण्यांत आलें. पुष्कळ मंत्र्यांना दोन किंवा तीन खाती देण्यांत आलेली आहेत. या खात्यांची कामें त्यांना डोईजड झालेली आहेत. माझ्याप्रमाणें कांही मंत्र्यांना भरपूर काम नाहीं. त्यांना भरपूर काम मिळावे म्हणून त्यांना जादा खातीं द्यावीत, असें त्यांचे मत होतें. एकादा मंत्री कांही दिवसांसाठी परदेशी गेला तरी त्याचें खातें कांही दिवसांसाठी माझ्याकडे सोंपविण्याचें प्रधान मंत्र्यांना सुचलें नाहीं. * निरनिराळ्या खात्यांची वाटणी मंत्र्यांमध्ये करतांना प्रधानमंत्री कोणत्या तत्वाचा अवलंब करतात, हें सांगणें कठिण आहे. मंत्र्यांची लायकी कीं विशवासपात्रता कीं मैत्री कीं पडत्या फळाची आज्ञा मानण्याची प्रवृत्ति पाहून प्रधान मंत्री त्यांच्याकडे विशिष्ट खाती सोपवित ? परदेशव्यवहार समिती, इत्यादि ज्या प्रमुख समित्या प्रधानमंडळ नेमते अशा एकहि समितीवर माझी नेमणूक केली नाहीं. आर्थिक व्यवहार समिती जेव्हां निर्माण केली तेव्हां मी अशी अटकळ बांधली कीं मीं अर्थशास्त्र आणि tear व्यवहार या विषयांचा कसून अभ्यास केलेला असल्यामुळे या समितीवर माझी निवड करण्यात येईल. परंतु, याहि वेळीं मला वगळण्यांत आलें; प्रधान मंत्री इंग्लंडला गेले तेव्हा या समितीवर मला नेमण्यात आले; पण ते परदेशाहून परत आले तेव्हां प्रधान मंडळाची पुनर्रचना