हिंदु समाजातील . .. . . उभारलेले पत्त्यांचे बंगले ? ४१३
करण्यासाठीं त्यांनीं ज्या योजना हाताळल्या त्यांत मला सदर समितीवरून काढून
टाकलें, पुढें प्रधानमंत्र्यांनीं प्रधानमंडळाची पुनः जी पुनर्घटना केली तेव्हां माझी
सदर कमिटीवर निवड केली. माझ्यासंबंधी मुख्य प्रधानांचें हे जें वर्तन होत होतें
त्याबद्दल मी त्यांच्या समोर निषेध केला तेव्हां त्यांचे डोळे उघडले व त्यांनी सदर
समितीवर माझी नेमणूक केली.
माझ्या बाबतींत जाणून बुजून जो पंक्तिप्रपंच करण्यात येत होता, त्याबद्दल मी
मुख्य प्रधानाकडे कधीं कुरकुर केली नाहीं. याबद्दलची ग्वाही मुख्य प्रधानच
देतील, अशी माझी खात्री आहे. सत्तेंचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एकाद्या
मंत्र्याची जागा रिकामी झाली असतां ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधान
मंडळांतील सभासदांत जी जिवापांड धडपड चालू होई, त्यांपासून मी पूर्ण पणें
अलिप्त राहात असे. मूकावस्थेत राहून सेवा करणें हेच श्रेष्ठ कर्तव्य होय असा
माझा विश्वास आहे. आणि त्याप्रमाणें प्रधान मंत्र्यांनी माझी योग्यता जाणून
माझ्याकडे जी जागा सोंपविली त्या जागेची सेवा मी मनोभावे केलेली आहे. अशा
परिस्थितींतहि माझ्या बाबतींत अन्याय झाला हें मला दिसले नाहीं, असें मी म्हटलें
असतें तर तें मनुष्य स्वभावाला सोडून होतें.
आपल्या सरकारबद्दल मी नाराज कां झालों याची दुसरी एक बाजू आहे. ती म्हणजे मागासलेले वर्ग आणि वर्गीकृत वर्ग यांच्या हिताबद्दल सरकारनें जी अनावस्था दाखविली ती होय. मागासलेल्या वर्गाच्या हितांसंबंधीं घटनेंत कांही तरतूद केलेली नाहीं, या गोष्टींचे मला मनस्वी दुःख होतें. राष्ट्राध्यक्षानी जें मंडळ नेमावयाचें आहे त्या मंडळानें या बाबतींत काय ती उपाययोजना सुचवावयाची व त्याची अंमलबजावणी पुढें व्हावयाची असें. घटना तयार करतांना ठरविण्यांत आलेलें होतें. आपण घटना मंजूर केली त्याला एक वर्ष होऊन गेले. परंतु सदर मंडळ नेमण्याचें सरकारला अद्याप जरूर वाटत नाहीं. १९४६ सालांत मी मंत्रीमंडळात नव्हतो. मी आणि दलित वर्गातील प्रमुख समाजसेवक
यांनी हें वर्ष अत्यंत चिंताक्रांत मनस्थितींत घालविलें.
दलित वर्गाचे राजकीय हितसंरक्षणाची हमी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी घटनेंत नमुद केलेलीं होती; परंतु त्यांनीं सत्तात्याग केल्यानंतर त्यांची जबाबदारी संपुष्टांत आली. या बाबतीत भारतीय घटना परिषद कोणते धोरण स्वीकारील व कोणते भरीव कार्य करील यासंबंधीं दलित वर्गांना मोठी चिन्ता लागलेली होती. या
चिन्ताग्रस्त मनःस्थितीतच मी दलित वर्गाच्या अनुकम्पनीय परिस्थितीचा आढावा
ATA ६४१ - २९