हिंदु समाजातील . . . . . उभारलेले पत्त्यांचे बंगले ? ४१५
असली तरी तिच्यापेक्षाहि प्रबळ इच्छा मला आहे. या बाबतींत मी कोणांपुढेंहि. मान वाकविणार नाहीं, परंतु मला सरकारकडून हें समजून घेण्याची इच्छा आहे कीं, हितसंरक्षणाला लायक अशी मुसलमान जमातचं तेवढी भारतांत आहे काय ? दलित वर्ग, वर्गीकृत वर्ग. अन्य जाती, आणि भारतीय खिस्ती लोक यांना हितसंरक्षणांची जरुरी नाहीं. असें सरकारला वाटते काय ? या लोकांच्या हितासंबंधीं प्रधान मंत्र्यांनी कधींकाळी कांही
कळकळ व्यक्त केलेलीं आहे काय ? माझ्या माहिती प्रमाणें प्रधान मंत्र्यानी
ही वृत्ति कधी व्यक्त केलेली नाहीं. आणि मुसलमानांपेक्षांही जर जास्त सरकारी संरक्षण कोणाला हवे असेल तर याच उपरिनिर्दिष्ट लोकांना होय.
सरकारने वर्गीकृत लोकांच्या हितसरंक्षणासंबंधीं जी अनास्था दाखविली त्यामुळे मी मनस्वी संतापलेला होतों. मी हा संताप माझ्या मनांत तसाच धुमसत ठेवला होता. कांही दिवसांपूर्वी वर्गीकृत लोकांची जी सभा भरविण्यांत आली होती तींत मी हा संताप कित्येक दिवसांनी व्यक्त केला. सरकारी नोकऱ्यांत वर्गीकृत लोकांना साडेबारा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत, असा जो एक सरकारी नियम आहे त्यामुळें वर्गीकृत लोकांचा फारसा फायदा झालेला नाहीं, असा सरकारवर मी नेहमी आरोप करतों. यासंबंधीं गृहमंत्र्यांना कोणीसा असा प्रश्न विचारला कीं, या आरोपांत तथ्य आहे काय ? या प्रश्नाला उत्तर देतांना गृहमंत्री महाशय म्हणाले कीं, हा आरोप निराधार आहे. आपण दिलेल्या या उत्तराला पुरावा गोळा करून ठेवण्यासाठी म्हणा अगर ठोकून देतो ऐसाजे असें जें.आपण उत्तर दिलें तें सत्याला धरून नव्हतें अशी त्यांची सद्सदविवेक बुद्धि त्यांच्या मनाला एकसारखी टोंचणी मारीत होती म्हणून म्हणा--पण गृहमंत्री महाशयानीं एक सर्क्युलर काढून प्रत्येक खात्याला असें विचारलेले आहे कीं, अलीकडे सरकारी नोकऱ्यांत वर्गीकृत लोकांचे किती उमेदवार घेतले गेले ? या बाबतींत मला जी माहिती मिळाली आहे ती वरुन मी असें प्रतिपादन करूं शकतों कीं, प्रत्येक खात्याकडून सर्क्युलरला असें उत्तर मिळालेलें आहें कीं, आमच्याकडे एकादा-दुसरा | उमेदवार एकाद्या ऑफिसांत घेतलेला आहे; परंतु एकंदरींत जास्त उमेदवार घेतलें नाहींत एवढें खास. मला मिळालेली ही माहिती जर -बरोबर असेल, तर गृहमंत्र्यांनी प्रश्न विचारणाराला जें उत्तर दिलें त्यावर मला मल्लीनाथी करण्याची जरूरी रहात नाहीं.
मी वर्गीकृत लोकांत जन्मलो व त्या लोकांची प्रगति घडवून आणण्यासाठी आपलें आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणांतच केलेली