हिंदु समाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीच भेद व लिगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारण्याचे कायदे म्हणजे घाणं न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले ! - Page 458

४१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषें माझ्या आयुष्यांत आलीं व गेलीं. फक्त स्वतःचेच चांगलें करण्याचें मी लहानपणांत ठरविलें असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आलें असतें. आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तींतील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपयोग घेतला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतीप्रीत्यर्थ मी माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविलें आहे आणि तें ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलों आहे. तें तत्त्व हें कीं, जें कार्य सफल करण्याचा एकाद्याला भरपूर उत्साह वाटतो व तें कार्य पार पाडणें हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्यानें तें कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तरी तें श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हितानहितांचा प्रश्‍न सरकारनें फार दिवस त्रिशंकूप्रमाणें लोंबकळत ठेवलेला आहे, हैं पाहून माझ्या मनाला दुःखाच्या किती वेदना झालेल्या असतील, याची तुम्हांला वरील हकिकतिवरून स्पष्ट

कल्पना येईल.

तिसरी गोष्ट परदेशांसंबंधींचें सरकारचें धोरण, या गोष्टीनें मला नाराज तर केलें आहेच ; शिवाय तिनें मला चिंतेत व मानसिक यातनेच्या खाईत लोटलेले आहे. या धोरणाबद्दल जो कोणी खोल विचार करील आणि त्या धोरणामुळे इतर देशांनीं भारताशी जे संबंध ठेवले याबद्दलची जो ज्यास्त माहिती गोळा करील त्याला हे दिसून येईल कीं, इतर देशांनीं भारताशीं ठेवलेल्या संबंधांत एकदम फेरफार घडवून आणला. १५ ऑगस्ट १९४७ ला आम्हीं स्वतंत्र देश म्हणून वागू लागलों. तेव्हा आमचें वाईट चिंतणारा एकहि परदेश नव्हता. जगांतील प्रत्येक देश आएणांकडे मित्रत्वाच्या भावनेनें पाहात होता, चार वर्षानंतर आज आपणांला सर्व मित्र सोडून दूर गेलेले आहेत. आता जगांतील एकहि देश आपला मित्र म्हणून राहिलेला नाहीं. आम्ही आमच्या कृतीनी Gerard संबंध तोडले. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकींतहीं आम्ही एकीकडे शिलेदार म्हणून वावरत आहोंत. तेथे आम्हीं एकादा ठराव मांडला तर त्याला दुजोरा देण्यास कोणी पुढें येत नाहीं. अशी आमच्या परराष्ट्र धोरणाची स्थिति आहे. या स्थितीचा मी जेव्हा जेव्हां विचार करतों तेव्हां तेव्हां मला बिस्माक आणि बर्नार्ड शॉ यांच्या उद्गारांची आठवण होते. बिस्माकनें म्हटलेले आहे कीं, “' राजकारण म्हणजे एखादी असंभवनीय गोष्ट साध्य करण्याचा खेळ नव्हें. राजकारण म्हणजे

संभवनीय गोष्ट साध्य करण्याचा खेळ आहे.” थोड्याच दिवसापूर्वी बर्नार्ड शॉ