हिंदु समाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीच भेद व लिगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारण्याचे कायदे म्हणजे घाणं न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले ! - Page 459

हिंदु समाजातील . . . . . उभारलेले पत्त्यांचे बंगले ? ४१७

म्हणाला होता कीं, चांगली ek नजरेसमोर ठेवणें हें चांगलें परंतु सदैव

चांगलेपणाच्या पाठीमागें लागणें हें फार धोक्याचे आहे, हेहि लक्षांत ठेवलें

पाहिजे. जगांतील सर्वश्रेष्ठ व्यक्तींनी काढलेल्या वरील उद्गारांच्था सर्वस्वी

विरुद्ध बाजूला आमचें परराष्ट्र धोरण आहे.

असंभाव्य गोष्टी करण्याच्या मागें लागणें आणि सदैव संतपणाचा अवतार धारण

करणें या धोरणामुळे आम्ही आमचें किती नुकसान करुन घेतलेलें आहे. याची साक्ष

लष्करावर होत असलेला आमचा भरमसाट खर्च, लाखो क्षुधापिडित जिवांना अन्न

देण्यासाठीं भोगावे लागणारे कष्ट आणि आमच्या देशांत औद्योगीकरणाला

लागणारी आर्थिक मदत मिळण्याची पडलेली पंचाईत या गोष्टी देतील.

तीनशे पन्नास कोटी वार्षिक उत्पन्नांतून एकशें ऐशी कोटी रुपये आम्ही लष्करावर खर्च करतो. या अवाढव्य खर्चाला दुसरें उदाहरण नाहीं. आमच्या परराष्ट्रीय धोरणाचा हा परिणाम होय. आमच्या संरक्षणाचा बोजा हलका करणारा आमचा मित्र नाहीं. तो आम्हींच उचलला पाहिजें. त्यामुळें हे परराष्ट्रीय धोरण कितपत शहाणपणाचे आहे तें पहा.

|

पाकिस्थानशीं वैमनस्य हैं आमच्या परराष्ट्रीय धोरणाचे एक अंग आहें. या वैमनस्यांचें मला वावडें आहे

पाकिस्थानशीं वैमनस्य येण्याची मुख्यत: दोन कारणें आहेत. एक काश्मीरचे प्रकरण व दुसरें पूर्व बंगालमधींल भारतीय जनतेची वर्तमानपत्रावरून समजणारी काश्मीरी जनतेपेक्षां अनुकंपनीय परिस्थिती. असें असतांना फक्त काश्मीरचेंच ढोलके आम्हीं वंजवीत आहोंत, तरीपण आपण खऱ्या तत्वावर भांडतच नाहीं असा माझा दावा आहे. कोण खरा हा मूलतः प्रश्न नसून काय योग्य हाच मुद्दा आहे. म्हणून काश्मीरची फाळणीच योग्य असें माझें प्रामाणिक. मत आहे. भारताच्या फाळणीच्या प्रमाणें काश्मीर मधील बुद्धधर्मीय व हिंदी भाग भारताकडे असावा ब बहुसंख्यांक मुसलमानांचा विभाग पाकिस्थानला जोडला जावा. काश्मीरांतील मुसलमानांच्या प्रश्‍नांशीं आमचा वास्तविक संबंध नाहीं. तो पाकिस्थान व तेथील स्थानिक मुसलमान यांचा प्रश्‍न आहे. त्यांनीं तो वाटेल तसा सोडवावा. नाहींतर काश्मीरचे, काश्मीरचे खोरे, जम्सू-लडाक विभाग'व युद्धविराम विभाग असे तीन विभाग करावेत. व फक्त्त काश्मीरच्या खोऱ्यांतील विभागांत सार्वमत घ्यावें. ज्या सार्वमताचा विचार करण्यांत येत आहे त्याचा