हिंदु समाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीच भेद व लिगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारण्याचे कायदे म्हणजे घाणं न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले ! - Page 460

डॉ. बाबसाहेब (आंबेडकर लेखन आणि भाषणे ४१८

पाकिस्थानांत जाईल याची परिणाम काश्मीरचा हिंदी व बुद्ध संस्कृतीचा भाग

साधार भिती वाटत आहे. त्यामुळें आज पूर्व बंगालमध्यें ज्या'घटनांना तोंड द्यावे

व लागत आहे तेच प्रश्‍न इच्छा नसतांना पाकिस्थानांत पडलेल्या हिंदी बुद्ध

जनतेबाबतींत तोंड वासून उभे राहतील.

आतां माझ्या राजीनाम्यास कारणीभूत झालेल्या दुसऱ्या प्रश्‍नांकडे वळतो. हिंद संरकारचें मंत्रीमंडळ म्हणजें वेगवेगळ्या समितींनीं अगावूच ठरविलेल्या कार्याची रुपरेषा -नोंदण्याचें व सील बद्ध करण्याचें केंद्र बनलें आहे. हें मंत्रीमंडळ या समितींच्याच तंत्राने चालते. एक संरक्षण समिती आहे. एक परराष्ट्रीय कामकाज समिती आहे. परदेशीय सर्व महत्त्वाच्या'घटमांवर ही समिती उपाय योजतें तसेंच संरक्षणाचे प्रश्‍न संरक्षण समिती पहाते. यावर कांही मंत्री -सभासद नेमले जातात. मी यापैकीं कोठल्याहीं समितीचा सभासद नव्हतो.

या समित्या गुप्तपणें आपलीं कामें करतात, जे मंत्री सभासद नसतील त्यांना देशांचे धोरण ठरविण्यांत भाग घेतां येत नाहीं, पण संयुक्त जबाबदारी मात्र पत्करावी लागतें. ही एक चमत्कारीक व'अशक्य प्राय गोष्ट करावी लागत असे.

आतां राजीनामा देण्यांस अखेर जी -गोष्ट कारणीभूत झाली ती सांगतो व ती म्हणजे हिंदु कोड बिलाबद्दल सरकारनें केलेला चालढकलपणा व बेपर्वाई होय. हें बिल प्रथम ११ एप्रील १९४७ सालीं -मांडलें गेलें. चार वर्षापर्यंत तें तग धरूं शकलें व त्यांतील चार कलमें मंजूर .झाल्यावर या बिलाची अक्षरशः हत्या करण्यांस वैश्यम्य कोणास वाटलें नाही. बिलाचीं सुरवातच आंकडीनें झाली | जवळ जवळ एक वर्ष तें बिल सिलेक्ट -कमिटीकडें पाठवावे याची

सरकारला आवश्यकता वाटली नाहीं.

सिलेक्ट कमेटीकडे बिल ९ एप्रील १९४८ सालीं पाठविण्यांत आले व तिनें १२ ऑगस्ट १९४८ रोजीं आपला अभिप्राय पार्लमेन्टला सादर केला. त्याचा ठराव दिवसाचे कामकाजावर आणण्यांतच एवढा काळ गेला, १९४९ च्या फेब्रुवारीच्या अधिवेशनापर्यंत हा ठराव बारगळला व त्याच्यावर चालू चर्चा करण्याचें नाकारण्यांत आलें, त्यामुळें तीं चर्चा दहा महिनें रेंगाळली ; चार दिवस फेब्रुवारीत, एक दिवस मार्च, २ दिवस wa १९४९ अशी चर्चेची विभागणी झाली | यानंतर १९-डिसेंबर १९४९ हा एकच दिवस देण्यांत आला व त्या दिवशी

माझा हिंदु बिलाचा सिलेक्ट कमिटींनें मान्य केलेला मसुदा पार्लमेंटपुढे यावा हा