हिंदु समाजातील . . . . . उभारलेले पत्त्यांचे बंगले ? ४१९
माझा ठराव विचारांत घेण्यात आला. १९५० सालीं हिंदु कोड बिलाला वांवच देण्यांत आला नाहीं ! पुढें ते बिल पांच फेब्रुवारी १९५१ रोजीं चर्चेस निघाले
- व एकएक कलमावर चर्चा होऊं लागली. यासाठीं फक्त पांच, सहा व सात हे तीनच दिवस देण्यांत आले व बिल परत बारगळले |
या पार्लमेन्टचें हे शेवटचें अधिवेशन असल्यामुळें हिंदु कोड बिलाची वासलात काय लावावयाची ते मंत्रिमंडळाने ठरविलें पाहिजे होतें. तें चालू पार्लमेन्टनें पूर्ण करावें कीं नव्या पार्लमेन्टपुढें ठेवावें याचा विचार व्हायला पाहिजे होता. त्याप्रमाणे तें या पार्लमेंटमध्ये निकालांत काढावें असें ठरलें. म्हणून बील १७ सप्टेंबर १९५१ रोजीं चर्चेस काढलें गेलें. ही चर्चा चालु असतां पंतप्रधानांनी एक नवीन योजना मध्येंच मांडली कीं वेळेच्या अभावी सर्व बिल कलमवार घास होणें शक्य नाहीं म्हणून त्यांतील कांही भाग पास करून त्यांचा कायदा व्हावा म्हणजे सर्व बिल तरी खितपत पडणार नाहीं. हा तर मलों मोठा पेंच होता. पण मी तें मान्य केलें, कां तर ' जिर्थे सारें जातें तिथें थोडें वांचविण्याचें ' तरी घडावें | या बिलांतील लग्न व घटस्फोट हे विभाग निवडावेत असें पेतप्रधानांनीं सुचविले. अशी कातरी लावून बिल अखेर मांडले गेलें. दोन तीन दिवंसांच्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी परत दुसरी योजना बाहेर काढली व ती म्हणजे सर्व बिलच गाळण्यांत यावें | हा मात्र मला मोठ्यांत मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मी मूग्धच झालों. हें कातर लावलेलें बिल वेळेच्या अभावीं पुढें ढकलण्यांतं येत आहे हें आतां मला पटण्याजोगें नव्हतें व मान्यही नव्हतें. कारण आपलीं बिलें पुढें ढकलून ती पास करण्याकडे इतर वजनदार सरकार मंत्री लटपट करीत होते याची मला कल्पना होती.
बनारस अलिगड विशवविद्यालयाची बिलें व प्रेस बिले, जी अपूर्णा अवस्थेंत : होती, त्यांना संपूर्णावस्थेंत असलेलें हिंदु कोड बिल हुलकावून यांना पार्लमेन्टपुढे मांडण्यांस वेळ कसा दिला. गेला तें मला समजत नाहीं. ही विश्वविद्यालयें चालविण्याबाबतींत कांही अस्तित्वांत कायदा नव्हता अशी कांही गोष्ट नव्हती. ` हीं fact इतक्यांत पास झाली नसती तरीही दोन विश्वविद्यालयें रसातळास पोंचली नसतीं. प्रेस बिल पण कांही घाईने पुढें आणण्याचे कारण नव्हतें. हीं बिलें स्थगित करतां आली असतीं. पंतप्रधान हिंदु कोड बिलाबद्दल प्रामाणिक नव्हतें असें नाहीं पण हिंदु बिल पास करण्यास हवी तितकी चिकाटी व आस्था त्यांच्यात नव्हती खास. |