४२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
स्पष्ट असा कीं पार्लमेन्टला चालू सरकार नको. अर्थात नवें सरकार ती जागा घेईल. म्हणून सभासदांनी हे पक्के ध्यानांत ठेवावें कीं हिंदु कोड बिल हें महत्वाचे बिल आहे व सरकारचें अस्तित्व यांवर अवलंबून राहण्याइतके तें सरकारला
महत्वाचे वाटतें. “
यानंतर ता. १९ डिसेंबर १९४९ मध्यें पंतप्रधान म्हणाले, " सरकार हिंदु कोड बिलाला अधिक महत्व देत नाहीं अशीं कुणी चुकीची समजूत करून घेऊ नये. सरकारला या बिलाँचें फार महत्व वाटतें व केवळ तें त्यांतील विशिष्ट कलमालाँ अनुसरून नाही तर आर्थिकं व सामाजिक प्रश्नांचा मूलभूत छडा या बिलानें लावल" आहे म्हणून. आम्ही परकियांपासून स्वतंत्र झालों व राजकीय स्वातंत्र्य आम्ही मिळवलें. या स्वातंत्र्याच्या प्रवासांत अनेक टप्पे आहेत. आर्थिक, सामाजिक तर महत्वाचे आहेत. या सर्व आघाडीवर पुरोगामी प्रगती झाली पाहिजे तर समाज सुधारेल. “
ता. २६ सप्टेंबर १९५१ मध्यें परत पंतप्रधान म्हणतात :--
“हे बिल चर्चेस यावें व त्याची जशी जशी प्रगती होईल तसतशी सरकारला हवी आहे त्याचे निराळें आश्वासन सरकारनें देण्यांचें कारण नाहीं. शक्य तीं प्रगती होणे तर जरूर आहे. पण आता यावरील चर्चा स्थगित करावी असें आम्हांस वाटतें व पुढें संधि मिळताच ते चर्चेस ठेवण्यात यावें व तें याच पार्लमेंटमध्ये पास होईल."
हें आश्वासन पंतप्रधानांनीं बिल पुढें ढकलल्यावर दिलें. पंतप्रधानांच्या या आश्वासनावर विश्वास कोण ठेवणार नाहीं बरें ? पंतप्रधानांची आश्वासने व प्रात्यक्षिक यांत तफावत असल्याचें मला वाटत असल्यास तो अपराध माझा मुळींच नाहीं.
कदाचित माझ्या मंत्रिमंडळांतून जाण्यानें कुणास कांही महत्व वाटणार नाहीं. पण सत्याशीं मी एकनिष्ठ असेन तर बाहेर पडणेचः योग्य. त्यापूर्वी माझ्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल व शिष्टाचाराबद्दल मी त्यांचे आभार मानतो. “मी माझें पार्लमेन्टचें सभासदत्व कायम ठेवीत आहे. पार्लमेन्टच्या सभासदांनी माझ्या बाबतींत जो सोशिकपणा दाखविला त्याबद्दल त्यांचा पण मी आभारी आहे.
जनता : २० आँक्टोबर १९५१.