स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा ! - Page 472

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ४३०

शेलार मामाने कोंडाणा सर केला सैनिक असले तरी बस्स झाले. ८५ वयाच्या

शीर घेऊन पुढे सरसावले तेव्हां अवघे पंचविस कडवे नवजवान तळहातावर

होते. मुठभर इंग्रजांनीं एवढ्या मोठ्या या देशावर दिडशे वर्ष राज्य केले ते कशाच्या जोरावर | संघटणेच्या नि शिस्तीच्या. म्हणून नुसती संघटना आम्हाला नको तर ती सुसंघटणा हवी. तिच्यात इर्षा आणि स्वाभिमानाचा अग्नी

सारखा प्रज्वलीत राहीला पाहिजे.

हा अग्नी प्रज्वलीत ठेवायचा झाल्यास, आपली जी संघटणा फेडरेशन ती बळकट केली पाहिजे. फेडरेशन बळकट करायची झाल्यास दरएक वयांत आलेल्या स्त्री-पुरुषानें वर्षाचे चार आणे भरून तिचे सभासद झाले पाहिजे. असें शेकड्याने किंवा हजारोनें नव्हे लाखांनीं सभासद होऊन तिचा निळा झेंडा फडकवित ठेवला पाहिजे. तेच निळे निशाण आपल्या स्वाभिमानी चळवळीचें “ प्रतिक “ आहे. त्या निळ्या निशाणा खालीच एकत्र येऊन आपण अनेक निकराचे लढे दिलेत. त्यानेच आपल्यात बंधुभाव नि आपुलकी निर्माण केली न्‌ माणुसकी जागृत ठेवली. नुसत्या मुंबईत तीन ते चार लाख दलित वर्गांची लोकसंख्या होईल. एक लाख लहान मुलं नि अर्भके सोडली तर तीन लाख लोक जर फेडरेशनच्या निळ्या निशाणाखाली एकत्र आले तर जगांतील मानबिंदू

आम्हीं गाठलाच म्हणून समजा.

परिणाम काय होईल

आज या देशांत बरेचसे राजकीय पक्ष आहेत. त्या सर्वांचे भांडवल मुंबई

सारख्या शहरातूनच आहे: नुसत्या मुंबईतच काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, हिंदुमहासभा वगैरे पक्ष ठाण मांडून बसले आहेत. दरेकाच्या कचेरींत जाऊन त्यांच्या पक्षाचे सभासद नोंदणीचे रजिस्टर पाहिले तर कोणाचेही एक लाख

सभासद मिळणे शक्य नाही. कारण या पक्षांचे राजकीय अधिष्ठान या देशांतील

भांडवलदार, जमीनदार, जहागीरदार, कारखानदार नि धर्ममार्तंड या सारख्या

प्रतिगामी विचार सरणीच्या लोकांवर चालले आहे. फेडरेशनचा तसा काहीं कोणाशीं लागाबांधा नाहीं. नव्हे फेडरेशनमध्यें या विचारसरणीलाच मुळीं स्थान

नाहीं. थोडक्यात फेडरेशन सारख्या सोज्वळ स्वरुपाचा पक्षच या देशात

अस्तित्वांत नाहीं असे आमचे ठाम मत आहे.

अशा या सोज्वळ नि स्वतःच्या ताकदीवर पुढे पाऊल टाकणाऱ्या पक्षाचे

भवितव्यही सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. म्हणूनच महा मुंबईच्या फेडरेशनने