स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा ! ४३१
एक लाख सभासद नोंदविण्याची मोहीम सुरु केलेली आहे. ही आमची मोहीम यशस्वी झाल्यास आम्हांला फेडरेशनचा कार्यक्रम हाती घेणें सुलभ तर जाईलच पण आमच्या पक्षाची आर्थिक परिस्थितीही कमालीची सुधारेल. सरकारनें हल्लीच जसे दलित वर्गाच्या परिस्थितीची पहाणी करण्याकरतां कांही तोंडपुंज्या लोकांचे कमिशन -नेमले आहे, तशातन्हेचे पण खास अस्पृश्यांच्या जीवनाशी ज्यांचा निकटचा संबंध आहे, जे त्यांच्या रक्त मांसाचे आहेत, जें त्यांच्याच उदरी जन्म घेऊन परिस्थितिशी अहोरात्र झगडत आहेत, अशा हाडांच्या अस्पृश्यांचे एक कमिशन फेडरेशन नेमील. अस्पृश्यांच्या जीवनाची ते कमिशन बारकाईने छाननी करून त्यांच्या साद्यंत हकिगतिचा ते एक अहवाल तयार करील. तो अहवाल फेडरेशन ग्रंथ रुपात छापून काढील. त्याची एक प्रत भारत सरकारें त्याच प्रमाणे जगातील इतर राष्ट्रांनाही पाठविल्या जातील. इतकं करूनही भारत सरकारच्या दृष्टीकोणांत कांही बदल झाला नाही तर जागतिक न्यायालयाकडे (युनो) बॅ. कांबळे सारख्या खमके बॅरीस्टरांची योजना करून, तेथें आम्ही भांडण सुरूं करून राज्यकर्त्यांची नि हिंद म्हणविणारांची लक्तरे अशारीतीने जगाच्या वेशीवर टांगू. हा आमच्या पक्षाचा सनदशीर मार्ग आहे.
याची दखल राज्यकर्त्यांनी घेतल्यास, बाबासाहेबानी सहा महिन्यापूर्वी दिलेल्या इषाऱ्याप्रमाणें होईल.
७७७
mc ——_— ् ् ् ् ् ्ू्nmx»झ्
शब्दांकन-रामचंद्र आं. जाधव.
जनता : ता. ९ मे १९५३.