११२३
भाषावार प्रांत रचना
प्रत्येकाने आपण स्वतंत्र आहोत, दुसच्यांहून भिन्न आहोत असा
एकसंघपणाचा अर्थ करून घेतला तर थोड्या अवधीत
हिंदुस्थानचेही छकले होतील
` ब्रिटिशांनी दीडशें वर्षांहून अधिक काल भारतावर राज्य केलें. या राजवटीत भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न नेहमी समोर असतांनाही ब्रिटिशांनी भाषावार प्रांतरचना केली नाहीं. अनेक भाषीय प्रांतांतील लोकांच्या ' संस्कृतिऐक्या ' च्या हाकाटीला दाद न देतां मजबूत राजशासन, कायदा आणि शांतता प्रस्थापित करण्याकडेच अधिक लक्ष घातलें. वस्तुतः त्यांच्या राजवटीच्या उत्तरार्धात त्यांना कळून चुकले की, त्यांनी निर्माण केलेल्या राज्ययंत्रामध्ये ज्याठिकाणी अधिक बेबनाव आहे अशा ठिकाणी तरी भाषावार प्रांतरचनेच्या दृष्टीने काही सुधारणा अवश्यमेव आहेत. इंग्रज निघून जाण्यापूर्वी बंगाल, बिहार आणि ओरिसा हे भाषावार प्रांत त्यांनी निर्माण केले हा त्याचा दाखला आहे. अजूनही इंग्रजी सत्ता भारतावर राहिली तर त्यांनी सामान्य तर्काला अनुसरून भाषावार प्रांतरचना करण्याचा मार्ग पुढें चोखाळला असता की नाहीं हें सांगणें थोडें अवघड आहे.
ब्रिटिशांनी भाषावार प्रांतरचनेचा विचार करण्यापूर्वी गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९२० साली भाषावार प्रांतरचनेच्या आधाराने एक घटना बनविली. अर्थात १९२० सालीं काँग्रेसने बनविलेल्या हया घटनेला आधारभूत विचारप्रणाली विशुद्ध विचार विनिमयांतून झाली कीं, काँग्रेसच्या गोटांत जनतेला ओढण्यासाठी हें चेटूक केलें हें अजमावण्यासाठी आतां कुणी वेळ cag नये. मात्र ब्रिटिशांनी भाषावार प्रांतरचनेचें महत्व ओळखलें आणि लागलीच कांही प्रांतांची भाषावार रचनाही केली.
१९२० च्या घटनेनें काँग्रेसने आपल्यावर जी जबाबदारी घेतली त्याचा १९४५ पर्यंत तरी तिनें उल्लेखही केला नाहीं पण १९४५ मध्यें जेव्हा अधिकारग्रहण करण्याचा प्रसंग आला तेव्हा मात्र काँग्रेसच्या म्हातारीचा कोंबडा झाकलेला असतानाही भाषावार प्रांतरचनेचा रवि उमठ्यावर उगवलाच ! अलिकडेच भारतीय संसदेच्या एका सभासदाने संसदेमध्ये भाषावार प्रांतरचनेचा ठराव आणून