भाषावार प्रांत रचना | ४३३
या प्रश्नाला आवश्यक ती गती प्राप्त करून दिली. सरकारच्यावतीने संसदेच्या चर्चेत या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी पर्यायाने माझ्यावरच आली. स्वाभाविकच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा दृष्टिकोन निश्चित करून घेण्यासाठी ही बाब मी त्यांच्याकडे नेली आणि आश्चर्य हें कीं, कांही प्रांतांची भाषावार रचना करण्यास या वरिष्ठांचा (High Command) बिलकूल विरोध होता. अशा परिस्थितीत ह्या चर्चेला उत्तर देण्याची जबाबदारी. पंतप्रधानांनींच घ्यावी हा एकच उचित मार्ग होता. अर्थातच पंतप्रधानांनीं या चर्चेस उत्तर दिलें आणि आघ प्रांत लागलीच प्रस्थापित होईल असें आश्वासनही दिलें. पंतप्रधानांच्या या आश्वासनावर भाषावार प्रांत रचनेचा ठराव मागें घेतला गेला आणि हा प्रश्न इथेच थड झाला.
घटना-मसुदा तयार झाल्यावर पुनः एकदा या प्रश्नाला तोंड देण्याचा माझ्यावर प्रसंग आला. घटनेतील ' अ ' विभाग प्रांतामध्ये आंध्र प्रांताचा समावेश करावा की नाही यासंबंधाने मी त्यांना पत्राद्वारे पृच्छा केली. त्याला पुष्टी म्हणून संसदेतील तद्विषयर्क चर्चेची व त्यांनी दिलेल्या आश्वासनाची स्मृतीही त्यांना करून दिली. त्याबाबतीत वस्तुतः कुठे माशी शिंकली हें मला ठाऊंक नाही. मात्र घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी उत्तर प्रांताचे एक वकील श्री. धार यांच्या नेतृत्वाखाली भाषावार प्रांत रचनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नियोजित केली, एवढे मात्र खरे !
भाषावार प्रांत रचनेप्रमाणे संयुक्त-महाराष्ट्र निर्माण झाला तर कोणत्याही परिस्थितीत मुंबई शहर त्यामध्यें समाविष्ट होणार नाहीं, असें जे मत धार-समितीनें दिले त्यामुळें तरी धार-समिती आमच्या स्मृतीतून जाणें शक्य नाहीं. धार-समितीचा हा अहवाल काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनांत विचारात [घेण्यात ] [आली. ] जयपूर अधिवेशनात या कामासाठी खुद्द पंतप्रधान, वल्लभभाई पटेल आणि डॉ. [पट्टाभि- ] सितारामय्या या त्रयींची निवड झाली. त्यांनी जो अहवाल काढला त्याचा सारांश एवढाच की, आंध्र प्रांताची त्वरीत रचना व्हाची. मांत्र मद्रास शहर तामिळांनाच ad! याबाबंतींत तपशिलवार शिरण्यासाठी एक, समितीही नेमण्यांत आली. या समितीनें एक बहुमताने अहवाल तयार केली. पण या अहवालाला श्री. प्रकाशम्सारख्या प्रमुख व्यक्तीचाच विरोध [होता. ] कारण त्यांना मद्रास शहर हातचें घालवावयाचे नव्हते आणि त्यामुळेच [आंध्र ] [प्रांत ] [रचनेचा ] [गाडा ] इथेंच थडकला
त्यानंतर श्री. पोट्टी श्रीरामुलु यांच्या मृत्यूची घटना घडली. त्यानें आंध्र प्रांतासाठी आपला जीव दिला. सगळ्या काँग्रेसवाल्यांनीं आंध्र प्रांत निर्मितीची गोष्ट मान्य करूनही सर्वसंमत गोष्टीला निष्कारण दिरंगाई करून श्री: श्रीरामुलुला